Dolly Chaiwala | डॉली चायवाला उतरला नऊ कोटींच्या गाडीतून!

Dolly Chaiwala | डॉली चायवाला उतरला नऊ कोटींच्या गाडीतून!
Published on
Updated on

नागपूरः येथील डॉली चायवाला (Dolly Chaiwala) सध्या खूपच चर्चेत आहे. अलिकडेच त्याने 'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक व अनेक वर्षे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेल्या बिल गेट्स यांना आपल्या टपरीवर विशिष्ट स्टाईलने चहा बनवून दिल्याने आणखी प्रसिद्ध झाला होता. हा माणूस कालपर्यंत केवळ एक चहाची टपरी चालवणारा सामान्य विक्रेता होता; पण आता त्याची फॅन फॉलोईंग एखाद्या सेलिब्रिटीसारखी वाढत चालली आहे.

अर्थातच, या वाढत्या प्रसिद्धीमुळे मिळणारा आर्थिक लाभदेखील वाढत चालला आहे, अन् याची झलक तुम्ही या व्हायरल होणार्‍या व्हिडीओमध्ये पाहू शकता. डॉली चायवाल्यानं चक्क रोल्स रॉयल्ससोबत काढलेला एक व्हिडीओ शेअर केलाय. लक्षवेधी बाब म्हणजे या गाडीची किंमत जवळपास 9 कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे ही गाडी मोठमोठ्या सेलिब्रिटींनादेखील परवडत नाही. पण, इतक्या महागड्या गाडीसोबत व्हिडीओ शेअर केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. काहींनी स्वत:च्या उच्च शिक्षणाची फिरकी घेत डॉलीचं कौतुक केलंय.

हा व्हिडीओ डॉलीनं आपल्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो रोल्स रॉयल्स कारमधून उतरताना दिसतोय. एवढंच नव्हे तर, 'कोण म्हणतं एक चहावाला रोल्स रॉयल्स खरेदी करू शकत नाही,' अशी एक मोटिव्हेशनल लाईनदेखील त्यानं मारली आहे. त्याचा हा व्हिडीओ 2 कोटी 72 लाखांपेक्षा अधिक नेटकर्‍यांनी पाहिला असून, सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय. सध्या डॉली मालदीवमध्ये असून, त्याने त्याच्या प्रवासाबद्दल आणि मालदीवमधले काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामध्ये डॉलीने मालदीवच्या लोकांसह तसेच तेथील बड्या व्यक्तींसह फोटो काढले असल्याचे आपण पाहू शकतो. मात्र, सध्या 'बॉयकॉट मालदीव' सुरू असताना अचानक डॉलीने तिथे गेलेले त्याच्या चाहत्यांना तसेच नेटकर्‍यांना पसंत पडले नसल्याचे त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून समजते. (Dolly Chaiwala)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news