Additional District Collector Ajay Pawar | शिरोली-किणी मार्गावरील अपघातांचे ऑडिट करा

अपर जिल्हाधिकारी पवार यांचे आदेश; जिल्हा सुरक्षा समिती बैठक
Additional District Collector Ajay Pawar |
Additional District Collector Ajay Pawar | शिरोली-किणी मार्गावरील अपघातांचे ऑडिट कराFile Photo
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : सर्वाधिक अपघातग्रस्त असणाऱ्या शिरोली-किणी मार्गावरील अपघाताचे ऑडिट करा, असे आदेश अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी सोमवारी दिले. जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य आणि प्रमुख महामार्गावरील दोन्ही बाजूची अतिक्रमणे संबंधित यंत्रणांनी काढावी, अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत दिल्या.

पवार म्हणाले, रस्ते अपघातामुळे अनेकांवर मृत्यू ओढवू शकतो. याचे प्रमाण कमी करणे संपूर्णत: हातात आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी अतिशय काळजीपूर्वक या कामाला प्राधान्य द्यावे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय तसेच केंद्र सरकारच्या सेव्हलाईफ फाऊंडेशनच्या सहकार्याने देशभरातील शंभर जिल्ह्यामध्ये ‘झिरो फॅटलिटी डिस्ट्रिक’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये कोल्हापूरचाही समावेश आहे.

या जिल्ह्यातून राष्ट्रीय, राज्य आणि प्रमुख महामार्ग जातात. जिल्ह्यातील सर्व महामार्गावरील खड्डे भरणे, रोड मार्किंग करणे, डिव्हायडरसंदर्भात फलक लावणे, सिग्नल दुरुस्ती, चौकात पट्टे मारणे, झाडांच्या फांद्या कट करणे, राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील अतिक्रमणे काढणे, त्याचबरोबर रोड लगतच्या साईड पट्ट्या भरून घेणे आदी कामे संबंधित विभागाने वेळेत करावीत, असे आदेशही त्यांनी या बैठकीत दिले. राहवीर योजनेची माहिती सर्व पोलिस स्टेशनमध्ये दर्शनी भागात लावावी तसेच या योजनेला व्यापक प्रसिद्धी मिळावी, अशी सूचना अशासकीय सदस्य विनायक रेवणकर यांनी या बैठकीत केली.

नॅशनल हायवेचे कार्यकारी अभियंता महेश पाटोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, कार्यकारी अभियंता डी. आर. भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी, इचलकरंजीचे उपप्रादेशिक अधिकारी श्रीकृष्ण नकाते, वाहतूक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

५२ ब्लॅक स्पॉट, त्याची तत्काळ दुरूस्ती करा

पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यात 52 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चिती करण्यात आल्याचे सांगितले. त्यावर या सर्व ब्लॅक स्पॉट लवकरात लवकर दुरुस्ती करा, असे आदेशही पवार यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.