

पुढारी ऑनलाईन डेस्क: आमचं तोंड उघडलं तर पळता भूई थोडी होईल. अडीच वर्षांनंतरचा कारभार केल्यानंतर फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे. फक्त खुर्चीसाठी लाळ घोटता. ठाकरेंच्या फस्ट्रेशनला उत्तर देण्याची गरज नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांसी बोलताना सांगितले.
दोन-दोन मंत्री तुरुंगात दाखवल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याचे धाडस त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी (उद्ध ठाकरेंनी) दाखवले नाही. मी गृहमंत्री झाल्याने अनेकांना अडचण आहे. जो चुकीचं काम करेल त्याला मी तुरुंगात टाकणार. मी गृहमंत्रीपद सोडणार नाही. संयमानं बोला असा उद्धव ठाकरेंना फडणवीस यांनी सल्ला दिला.
वाझे सारख्या ब्लॅकमेलरला वाचवण्याचं काम ते मुख्यमंत्री असताना केलं, हे सर्व जनतेला माहिती आहे. तत्कालीन मुख्यमंत्री अडीच वर्षे घरात बसले. जनतेत मिसळले नाहीत. घरात बसून कारभार पाहिला, जनतेला माहिती आहे, कोणी फसवणूक केली. मलाही खालच्या पातळीवर जाऊन बोलता येतं. मी नागपूरचा आहे, असे फडणवीस यांनी नमूद केलं.