

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातीलच नव्हे, तर देशातील एक प्रमुख 'टूरिस्ट डेस्टिनेशन' बनण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये आहे. जे जे आहे, ते योग्यप्रकारे जगासमोर मांडू, त्याचे प्रभावी मार्केटिंग करू, आवश्यक सुविधा निर्माण करू, त्यासाठी एकत्रितपणे काम करू, त्याद्वारे कोल्हापूरचा पर्यटन विकास करू, असा निर्धार सोमवारी दै. 'पुढारी' आयोजित पर्यटनविषयक राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली ही कॉन्फरन्स झाली. या कॉन्फरन्समध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेतली जाईल, असे रेखावार यांनी स्पष्ट केले.
दै. 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी उपस्थितांचे गुलाबाचे रोप देऊन स्वागत केले. कार्यकारी संपादक विजय जाधव यांनी, दक्षिण भारताच्या पर्यटनाचे प्रवेशद्वार म्हणजे कोल्हापूर हे आपण मान्य केले आहे. यामुळे कोल्हापूरच्या पर्यटन विकासाची आपली जबाबदारी आहे आणि ती कोल्हापूरवासीयांनी स्वीकारली पाहिजे, असे सांगत या कॉन्फरन्सचा उद्देश स्पष्ट केला. सरव्यवस्थापक (ऑपरेशन्स) राजेंद्र मांडवकर यांनी आभार मानले.
कोल्हापूर पर्यटनाचा अजेंडा
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पर्यटन आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात, लवकरच अंमलबजावणी
पर्यटन आणि पर्यटक सेवांवर भर राहणार;
22 पर्यटनस्थळे निश्चित
सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा, नैसर्गिक ठेवा जपणे, पर्यटनस्थळे निश्चित करणे आणि त्यातील कृतिशील समन्वय
रोटरीतर्फे सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणार
कोल्हापूर शहरात 250 आणि जिल्ह्यात तीन हजारांवर वारसास्थळे, त्यांची जपणूक
कोल्हापूरच्या ऐतिहासिक वास्तुरचनांचे संकलन
धार्मिक पर्यटन विकासासाठी अंबाबाई आणि तिरुपती देवस्थान समन्वय, पर्यटन सेवासुविधा
जोतिबा परिसराचा तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर विकास करण्याचा प्रस्ताव
अंबाबाई देवस्थान विकासाच्या योजना
चर्चेत मांडलेल्या महत्त्वाच्या सूचना
डेक्कन ओडिसी सुरू करा
कोल्हापूर आणि परिसरातील पाणस्थळे पर्यटनस्थळे म्हणून विकसित करा
गोवा आणि कोकणात जाणारे पर्यटक कोल्हापुरात थांबण्यासाठी प्रयत्न करा
पन्हाळा-जोतिबा रोप-वेचा प्रश्न मार्गी लावा
नृसिंहवाडी, खिद्रापूर, कोल्हापूर-प्रयाग चिखली जलपर्यटन सुरू करा
पर्यटन माहिती केंद्र उभारा
पर्यटनासाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उभारा
पर्यटकांना वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारा; त्यातून टॅक्सी, रिक्षा, ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांना रोजगार
कोल्हापूर पर्यटनाचे मार्केटिंग करा, वेबसाईट सुरू करा
पर्यटन व्यवसायासाठी कुशल मनुष्यबळास मोठी मागणी, ती पूर्ण करण्यासाठी समग्र व्यवस्था उभारा.
चक्रेश्वरवाडी, पळसंबे, खिद्रापूर, टाऊन हॉल येथील पर्यटनस्थळांचा प्रचार-प्रसार करा, पर्यटक सेवासुविधा उभारा
केरळच्या धर्तीवर 'कोल्हापूर ट्रॅव्हल मार्ट' उपक्रम राबवा
पर्यटकांसाठी मोफत मार्गदर्शन सुविधा सुरू करा
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पर्यटन सेल सुरू करा
पर्यटनासाठी 'होम स्टे' धोरण जाहीर करा
हॉटेल सुविधा वाढवा
दिशादर्शक फलक, माहिती फलक लावा
पार्किंग झोन तयार करा
प्रशिक्षण, नोंदणी, सेवांचे दर निश्चित करा
ट्रॅव्हल्स गाड्यांसाठी पार्किंग हब, बस पोर्ट तयार करा
एमटीडीसीचे कार्यालय सुरू करा
शिवाजी विद्यापीठात पर्यटन अभ्यासासाठी स्वतंत्र विभाग (डिपार्टमेंट) सुरू करा
कोल्हापूरच्या वेशीवर भव्य प्रवेशद्वार उभारा