

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली उच्च न्यायालयाने सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूरला घटस्फोट मंजूर केला आहे. कुणाल कपूर यांनी आपल्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून दिल्ली उच्च न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. (Chef Kunal Kapur Divorce) न्यायालयाने सांगितले की, कुणाल कपूर यांच्या बद्दलचा पत्नीचा व्यवहार आदरयुक्त आणि सहानुभूती असणारे नव्हते. कुणाल यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणामध्ये कुणाल यांना न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला आहे. (Chef Kunal Kapur Divorce)
जस्टिस सुरेश कुमार कैत आणि नीना बंसल कृष्णा यांच्या पीठाने मंगळवारी सेलिब्रिटी शेफ कुणाल यांना घटस्फोट मंजूर केला. न्यायालयाने सांगितले की, हे कायद्यात साफ आहे की, सार्वजनिकपणे जीवनसाथी विरोधात बेजबाबदारपणे, अपमानजनक आणि निराधार आरोप लावणे 'क्रूरते'च्या समान आहे. असे कोणतेही संभावित कारण उपलबध नाही की, दोघांनाही एकत्र राहण्यासाठी सांगू शकू."
कुणाल कपूर यांचे लग्न २००८ मध्ये झाले होते. त्यांच्या पत्नीने २०१२ मध्ये एका मुलाला जन्म दिला. शेफने आपल्या याचिकेत आरोप लावला होता की, त्यांची पत्नी वारंवार पोलिसांना फोन करायची आणि सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात अफवा पसरवण्याची धमकी देत होती. याशिवाय, ती कधीच त्यांच्या आई-वडिलांचा सन्मान करायची नाही. सेलिब्रिटी शेफने हा देखील दावा केला की, २०१६ मध्ये मास्टरशेफ इंडिया शोच्या शूटिंग वेळी ती आपल्या मुलासोबत स्टुडिओमध्ये घुसली होती आणि मोठा गोंधळ घातला होता.
कुणाल कपूर यांच्या पत्नीने त्यांच्यावर आरोप केला की, तो न्यायालयाची दिशाभूल करत आहे. पत्नीने दावा केला की, तिने नेहमी आपल्या पतीशी जीवनसाथीसारखे बोलणे ठेवले आणि प्रामाणिक राहिली.