ranveer-deepika
Latest
DeepVeer : गर्दीत रणवीरने दीपिकाला असे केले प्रोटेक्ट, जामनगरमध्ये अंबानींच्या सोहळ्याला हजेरी
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह तब्बल ६ वर्षानंतर आई-बाबा होणार आहेत. दीपिकाने आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. दरम्यान, दीपिका-रणवीर पहिल्यांदाच जामनगरमध्ये स्पॉट झाले. राधिका मर्चेंट आणि अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सेरेमनीसाठी मुंबईहून ते रवाना झाले होते. जामनगर एअरपोर्टहून बाहेर निघताच अभिनेत्री दीपिकाला गर्दीने घेरलं. तेव्हा रणवीर सिंह आपल्या पत्नीला प्रोटेक्ट करताना दिसला.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक इन्फोग्राफिक्स कार्डच्या माध्यमातून प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. कपलने जाहीर केलं होतं की, बाळाचे आगमन सप्टेंबर महिन्यात होईल.

