केरळ भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी ‘पीएफआय’च्‍या १५ जणांना फाशी

१९ डिसेंबर २०२१ रोजी केरळमधील भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव रंजित श्रीनिवासन यांची हत्‍या झाली हाेती. 
१९ डिसेंबर २०२१ रोजी केरळमधील भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव रंजित श्रीनिवासन यांची हत्‍या झाली हाेती. 
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केरळमधील भाजप नेते रंजित श्रीनिवासन यांच्‍या हत्‍या प्रकरणी मावेलिक्कारा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आज (दि.३०) १५ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. सर्व आरोपी हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) त्याची राजकीय शाखा असणार्‍या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सदस्‍य आहेत. सर्व आरोपींना न्यायालयाने २० जानेवारी २०२४ रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत दोषी ठरवले होते. ( Death penalty for 15 members of banned PFI for Kerala BJP leader's murder )

रंजित श्रीनिवासन हे केरळमधील भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव होते. १९ डिसेंबर २०२१ रोजी अलाप्पुझा नगरपालिकेतील वेल्लाकिनार येथे त्यांच्या घरात घसून हल्‍लेखोरांनी कुटुंबासमोर त्‍यांची हत्‍या केली होती. या प्रकरणी नसम, अजमल, अनूप, मोहम्मद अस्लम, अब्दुल कलाम उर्फ सलाम, अब्दुल कलाम, सफारुद्दीन, मंशाद, जसीब राजा, नवस, समीर, नजीर, झाकीर हुसेन, शाजी पूवाथुंगल आणि शेरनास अश्रफ यांना अटक झाली हाेती. सर्व आरोपी हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि त्याची राजकीय शाखा असणार्‍या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सदस्‍य आहेत.( Death penalty for 15 members of banned PFI for Kerala BJP leader's murder )

रंजित श्रीनिवासन यांची हत्या दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण

ही हत्या दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणाच्या श्रेणीत येते, असे निरीक्षण नोंदवत मावेलिक्कारा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्‍या न्यायाधीश श्रीदेवी व्ही.जी. यांनी १५ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली.

रंजित श्रीनिवास हत्‍या प्रकरणाचा तपास अलप्पुझा उपायुक्त यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने केला होता.24 फेब्रुवारी 2021 रोजी 'एसडीपीआय'चे राज्य सचिव के.एस. शान यांची हत्‍या झाली होती. या हत्‍येचा बदला घेण्‍यासाठी रंजित श्रीनिवासन यांची हत्‍या झाल्‍याचे तपासात स्‍पष्‍ट झाले होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news