Winter Solstice : दक्षिणायन, २२ डिसेंबरला वर्षातील लहान दिवस, रात्र मोठी
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : वर्षातून दोनदा पृथ्वीवर अयनदिन घडतो. त्यात २१/२२ डिसेंबर ला दक्षीण अयनदिन(Winter Solstice) तर २१/२२ जूनला उत्तर अयनदिन (Summer Solstice) होतात. दोन्ही वेळी दिवस-रात्र वेळात मोठा बदल घडतो. शुक्रवारी २२ डिसेंबरला वर्षातील सर्वात लहान दिवस तर मोठी रात्र असून सर्वांना अनुभवता येणार आहे.
पृथ्वी सुर्या सभोवती भ्रमण करताना २३.५ अंशाने कललेली असते. त्यामुळेच पृथ्वीवर ऋतू बदलत असतात.उत्तरायण, दक्षिणायन आणि विषुवदिन घडत असतात. उत्तरायनाची कमाल मर्यादा कर्कवृत्त तर दक्षिणायनाची मकरवृत्त असते.सूर्याच्या दक्षिणेकडुन उत्तरेकडे जाणाच्या भासमान मार्गाला उत्तरायण तर उत्तरेकडुन दक्षिणेकडे जाण्याचा मार्गाला दक्षीनायन असे म्हणतात.
२१/२२ जूनला पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे झुकलेला असतो तर २१/२२ डिसेंबर ला पृथ्वी चा दक्षिण ध्रुव सुर्याकडे कललेला असतो.त्यामुळेच आपल्या कडे सुर्याची किरणे लांब, तिरपी पडतात आणि तापमान कमी होते. रात्र मोठी आणि दिवस लहान होतो. उलट २१ जूनला सर्वात मोठा दिवस आणि रात्र लहान असते.
दिवस/रात्र किती काळ असते ?
दक्षिण अयनदिन किंवा हिव्वाळी अयनदिन ला एकूण २४ तासांपैकी ११ तास तर रात्र तर १३ तासाची असते. असे ढोबळ मानाने होत असले तरी वैज्ञानिक दृष्टिने पाहिल्यास प्रत्येक १०० किमी अक्षावर वेळात बदल होत असतो. पृथ्वी गोल असल्याने सूर्याची किरणे सारखीच सर्व ठिकाणी पडत नाही. अनेक वर्षांनंतर अयनदिन वेगळ्या दिवसाला (२१,२२ डिसेंबर) येत असतात. ह्या २०२३ वर्षी डिसेंबर अयनदिन हा २२ डिसेंबर ला भारतीय वेळेनुसार सकाळी ८.५७ (३.२७ UTC) ला होत आहे. ज्या वेळेला मकरवृत्तावर सूर्य येतो ती वेळ किंवा पृथ्वी चा ध्रुव २३.५ डिग्री उत्तरेला कललेला असेल. ती वेळ अयनदिन ची ठरली जाते. परंतु दिवस-रात्रीच्या वेळा मात्र भिन्न असतात. ह्या वर्षीचा आयनदिन २२ डिसेंबर ला सकाळी येत असल्याने २१ आणि २२ डिसेंबर चे दोन दिवस अगदीं थोडया वेळेच्या फरकाने लहान दिवसाचा आणि मोठ्या रात्रीचा आनंद घेता येईल.
खालील वेळा २२ डिसेंबरच्या आहेत
◾मुंबई ला दिवस-१०.५६ ३३ तर रात्र १३.०३.५६ तासाची असेल
◾नागपूर ला दिवस-१०.४८.२८ तर रात्र १३.१२.०३ तासाची असेल
◾पुणे येथे दिवस-१०.५८.४७ तर रात्र १३.०१.४३ तासाची
◾चंद्रपुर येथे दिवस-१०.५३.१३ तर रात्र १३.०७.१७ तासाची असेल.
शरीरावर काही परिणाम होतो की?
खरं तर आपले शरीराचे एक जैविक घड्याळ आहे. दिवस-रात्री प्रमाणे ते काम करीत असते.जेव्हा ह्यात बदल होतो तेव्हा ह्या घड्याळाला बदलावे लागते. ऍडजस्ट करावे लागते,परंतु अनेकदा जाणवत नसले तरी त्याचा शरीराला त्रास होतो.जसे झोपेचे वेळापत्रक बदलते,मूड बदलतो,डोकेदुखी,उदासीनता येते,पचनाच्या समस्या उद्भवतात अशी माहिती खगोल,पर्यावरण अभ्यासक प्रा सुरेश चोपणे यांनी दिली.
हेही वाचा

