दैनिक ‘पुढारी’तर्फे गुढीपाडव्यानिमित्त महिलांसाठी ७ एप्रिलला भव्य बाईक रॅली!

दैनिक ‘पुढारी’तर्फे गुढीपाडव्यानिमित्त महिलांसाठी ७ एप्रिलला भव्य बाईक रॅली!
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : महिला सक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या आणि महिलांच्या शक्तीचा जागर करण्यासाठी दै. 'पुढारी', 'टोमॅटो एफएम' ९४.३' आणि 'पुढारी कस्तुरी क्लब'च्या वतीने महिलांच्या भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. खास गुढीपाडव्यानिमित्त आणि मराठी नववर्षानिमित्त वीणा वर्ल्ड प्रस्तुत ही भव्य बाईक रॅली रविवारी (दि. ७) सकाळी ७.३० वाजता कोल्हापुरातील दसरा चौक येथून निघणार आहे.

दै. 'पुढारी' हे महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्र आहे. 'पुढारी कस्तुरी क्लब'च्या वतीने महिला सक्षमीकरणाचे विविध उपक्रम नेहमीच राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून दै. 'पुढारी' माध्यम समूहाच्या वतीने ही खास बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत शेकडो महिला सहभागी होणार असून, त्यातून स्त्रीशक्तीचा नारा बुलंद होणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, ठाणे आणि पुणे येथे एकाचवेळी या बाईक रॅली होणार आहेत. या रॅलीत मोठ्या संख्येने महिला पारंपरिक वेशात सहभागी होणार आहेत. कोल्हापुरातील दसरा चौक येथून रॅलीला प्रारंभ होईल. शहराच्या विविध भागांतून ११ किलोमीटरचा प्रवास करून या रॅलीचा पुन्हा दसरा चौकात समारोप होईल.

रॅलीत सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. बातमीत दिलेला QR Code स्कॅन करून नोंदणी करू शकता. या भव्य रॅलीत शहरातील महिला, महिला संस्थांनी तसेच मैत्रिणींच्या ग्रुपने सहभागी व्हावे. रॅलीत नावीन्यपूर्ण, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची वेशभूषा परिधान करून सहभागी होणाऱ्या महिलांना व त्यांच्या ग्रुपला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.

या रॅलीचे खास आकर्षण म्हणजे लकी ड्रॉ. या लकी ड्रॉ विजेतीला वीणा वर्ल्डच्या वतीने वूमन्स स्पेशल सिमला-मनाली (८ दिवस) या सहलीचे बक्षीस मिळणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस वीणा वर्ल्डतर्फे आकर्षक भेटवस्तू आणि डिस्काउंट व्हॉऊचर देण्यात येणार आहे.

सोबत असलेल्या QR CODE वरून अथवा (https://forms.gle/3ZZjMScaBsEFR1jH7) या लिंकवर क्लिक करून आपला सहभाग नोंदवणे आवश्यक आहे.. QR CODE अथवा लिंकद्वारे नोंदणी करून सहभाग घेणाऱ्या महिलांचाच वीणा वर्ल्ड लकी ड्रॉमध्ये समावेश होणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी. नोंदणीसाठी शेवटची तारीख ४ एप्रिल २०२४ आहे. तरी त्वरा करा आपला सहभाग आजच नोंदवा, असे आवाहन दैनिक 'पुढारी'तर्फे करण्यात आले आहे.

  • सहभागी महिलांना दैनिक 'पुढारी'तर्फे आकर्षक फेटा बांधण्यात येणार आहे.
  • सर्व सहभागी महिलांसाठी चहा, अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येईल.
  • नोंदणी केलेल्या सर्व महिलांना सर्टिफिकेट.
  • ड्रेसकोड पारंपरिक वेशभूषा, सफेद कुर्ता, जीन्स
  • सुप्रसिद्ध कलाकारांना भेटण्याची संधी स.७.३० वा. दसरा चौकात हजर राहणे. यानंतर येणाऱ्या महिलांना फेटा बांधला जाणार नाही.

रॅलीचा मार्ग

दसरा चौक-स्टेशन रोड-कावळा नाका विद्यापीठ चौक- सायबर मार्गे माऊली पुतळा राजारामपुरी-शाहू मिल-सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमागे मिरजकर तिकटी-महाद्वार रोड-पापाची तिकटी-महानगरपालिका मार्ग-भाऊसिंगजी रोड-सीपीआर चौक-दसरा चौक.

अधिक माहितीसाठी संपर्क
स्नेहा – ९४२३८२४९९७ उज्वला- ८३२९५७२६२८ दिपा – ८८०५००७७२४

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news