‘या’ विद्यार्थ्यांची CUET UG 2022 परीक्षा पुन्हा लांबणीवर, जाणून घ्या कारण
पुढारी ऑनलाईन डेस्क : परीक्षा केंद्रामध्ये बदल करण्याची मागणी करणार्या विद्यार्थ्यांची कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (एटीए ) अर्थात 'सीयूईटी' अंडर ग्रॅज्युएट ( CUET UG 2022) परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. ही परीक्षा १७ ते २० ऑगस्ट रोजी होणार होती. ती आता ३० ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. केवळ परीक्षा केंद्र बदलण्याची मागणी करणार्या ११ हजार विद्यार्थ्यांसाठीच ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे, असे 'युजीसी'ने स्पष्ट केले आहे.
CUET UG 2022 :३.७२ लाख विद्यार्थी देणार परीक्षा
यासंदर्भात माहिती देताना 'युजीसी'चे अध्यक्ष प्रोफेसर एम जगदीश कुमार यांनी सांगितले की, 'सीयूईटी' अंडर ग्रॅज्युएट परीक्षा १७ ते २० ऑगस्ट रोजी होणार आहे. ही परीक्षा ३.७२ लाख विद्यार्थी देतील. मात्र यातील ११ हजार विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार केंद्र दिले जाइईल, त्यानंतर त्यांची परीक्षा हाोणार आहे.
सीयुईटीच्या दुसर्या टप्प्यात झालेल्या गोंधळामुळे काही केंद्रावरील परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता परीक्षा केंद्र बदलाची मागणी करणार्या ११ हजार विद्यार्थ्यांसाठी ३० ऑगस्टनंतर नव्याने परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

