Crystal of Immortality : जानेवारीत मिळणार अमरत्वाचा ‘क्रिस्टल’?

Crystal of Immortality
Crystal of Immortality
Published on
Updated on

वॉशिंग्टन : 'टाईम ट्रॅव्हलर' म्हणजेच भूतकाळ किंवा भविष्यकाळ अशा कोणत्याही काळातील दुनियेत जाऊन पुन्हा वर्तमान काळात येणारे लोक. 'डोरेमॉन'च्या कार्टूनमध्ये डोरेमॉन व नोबिता असे टाईम ट्रॅव्हलिंग करीत असताना दाखवले जातात. ते कधी डायनासोरच्या काळात जातात तर कधी भविष्याच्या दुनियेत. चिमुरडा नोबिता तर भविष्यातील आपल्या मुलाला, नातवंडालाही भेटत असतो! अर्थात हे कल्पनेतील असले तरी आपण खरोखरच Crystal of Immortality भविष्यात जाऊन आलो आहे असा दावा करणारेही काही लोक या जगात आहेत. आता अशाच एका टाईम ट्रॅव्हलरने जानेवारीमध्ये संशोधक 'अमरत्वाचा क्रिस्टल' म्हणजे स्फटिक बनवतील असा दावा केला आहे.

या माणसाने दावा केला आहे की, तो 647 वर्षांनंतरचं जग पाहून परतला आहे. इतकंच नाही तर येत्या आगामी काळात माणसाला ती आनंदाची बातमी मिळणार आहे, ज्याची तो अनेक शतकांपासून वाट पाहात आहे. इनो अलेरिक नावाच्या सोशल मीडिया वापरकर्त्याने हा दावा केला आहे. त्याचे 26,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्याने आपल्या एका व्हिडीओमध्ये दावा केला आहे की, तो वर्ष 2671 मधून आला आहे. त्याने सांगितले की, 13 जानेवारी 2024 रोजी विज्ञान अमरत्वाचा क्रिस्टल शोधेल. या क्रिस्टलला जो स्पर्श करेल तो अमर होईल. या क्रिस्टलला Crystal of Immortality स्पर्श केल्यानंतर, सर्व भावना हळूहळू संपतील आणि तुम्हाला दिसेल की या विश्वात कशाचाही अंत नाही, असाही दावा त्याने केला. त्याने या क्रिस्टलचा फोटोही शेअर केला आहे.

अनेकांनी त्याचा दावा नाकारला, तर काहींनी असं होऊ नये असे म्हटले आहे. माणूस अमर होऊ शकत नाही, अशीही प्रतिक्रिया काहींनी दिली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीने तारखांसह अनेक भाकिते वर्तवली आहेत. 2 एप्रिल 2024 रोजी 9.8 रिश्टर स्केलचा भूकंप होईल आणि 750 फूट उंचीचा त्सुनामी येईल. यामुळे कॅलिफोर्निया किनारपट्टीचा मोठा भाग उद्ध्वस्त होईल, असाही दावा त्याने केला आहे. एवढेच नाही तर 22 मे 2024 रोजी एक द्रव्य तयार केले जाईल, ज्याला फक्त स्पर्श Crystal of Immortality केल्यावर त्यात पडणारी सावली जिवंत होईल! (ये तो कुछ जादाही हो गया!) शास्त्रज्ञ या द्रव्याचा तलाव बनवतील ज्याला 'द ग्रेट मिरर लेक' म्हटले जाईल, असाहा दावा त्याने केला आहे. अर्थात अशा लोकांच्या दाव्यांकडे निव्वळ करमणूक म्हणूनच पाहिले जाते, त्यावर विश्वास ठेवणारे क्वचितच कुणी असेल!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news