

मुंबई ; वृत्तसंस्था : कोलकाता संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू व्यंकटेश अय्यर याला यंदाच्या आयपीएलमध्ये अजून फारसे यश मिळालेले नसले, तरी तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. तेलुगू अभिनेत्री प्रियांका जवळकर हिला व्यंकटेश हा डेट करत असल्याची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये आतापर्यंतच्या तीनपैकी एकाही सामन्यात त्याला 20 पेक्षा जास्त धावा करता आलेल्या नाहीत.
अभिनेत्री प्रियांका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिच्या इन्स्टाग्रामवरील एका फोटोवर क्रिकेटपटू व्यंकटेश अय्यरने खास कमेंट केली आहे. प्रियांकाच्या फोटोवर व्यंकटेशने 'क्यूट' अशी कमेंट केल्यावर प्रियांकानेदेखील कोण तू? असे म्हणत लगेच रिप्लाय दिला आहे. या कमेंटनंतर सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
व्यंकटेश अय्यर आणि प्रियांका जवळकर एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होत आहे. दरम्यान, व्यंकटेश अय्यरने आतापर्यंतच्या तीन सामन्यांमध्ये 16, 10 आणि 3 धावा केल्या आहेत.