

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात कोरोनाच्या (Covid 19) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8,582 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 4,32,22,017 झाली आहे. याच्या एक दिवस आधी कोरोनाचे 8,329 रुग्ण नोंदवले गेले होते. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांसंख्येमुळे आणि बरे होणाऱ्यांची संख्या कमी असल्याने सक्रिय रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 44,513 वर पोहोचली आहे. तर एक दिवसापूर्वी सक्रिय रुग्णसंख्या 40,370 नोंदवली गेली होती.
देशात 24 तासांत कोरोनामुळे (Covid 19) चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यानंतर, मृतांचा आकडा 5,24,761 वर पोहोचला आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत कोरोनामधून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,435 नोंदली गेली आहे, तर देशात आतापर्यंत या साथीच्या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,26,52,743 झाली आहे. तसेच, रिकव्हरी दर 98.68 टक्के नोंदवला गेला आहे.
देशव्यापी कोरोना (Covid 19) लसीकरण मोहिमेअंतर्गत, देशात आतापर्यंत 195.07 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.