कोरोना परत आला ? राज्यासह दिल्ली, हरियाणा राज्यांत वाढले रुग्ण ; केंद्राकडून सतर्कतेचा इशारा

कोरोना परत आला ? राज्यासह दिल्ली, हरियाणा राज्यांत वाढले रुग्ण ; केंद्राकडून सतर्कतेचा इशारा

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र आणि मिझोराम या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सचिव राजेश भूषण यांनी राज्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की, मागील आठवड्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. जर आवश्यकता वाटली तर योग्य त्या नियमांची अंमलबजावणी करावी.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिन राजेश भूषण यांनी दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र आणि मिझोराम या राज्यांमध्ये मागील आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढीवरून कडक निरीक्षण करावे आणि गरज पडल्यास योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश दिलेले आहेत.

एकुणात भारतामध्ये मागील २४ तासांमध्ये कोरोनाचे ११०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही ४ कोटी ३० लाख ३३ हजार ०६७ झालेली आहे. सध्या सक्रीय रुग्णांची ११ हजार ४९२ पर्यंत गेलेली आहे. आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी ४३ रुग्णांचा कोरोमामुळे मृत्यू झाला आहे.

हे वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news