Cop28 dubai : पीएम मोदी COP 28 शिखर परिषदेत सहभागी होणार

PM Narendra Modi
PM Narendra Modi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजपासून (दि.३०) युएईमधील दुबई शहरात COP 28 शिखर परिषद सुरू होत आहे. या २८ व्या हवामान बदल शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होणार आहेत. ते उद्या १ डिसेंबर रोजी सायंकाळी या परिषदेत सहभागी होणार आहेत. यांसर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या UAE दौऱ्याबद्दल माहिती देताना परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी माध्यमांना सांगितले.

याविषयी माहिती देताना परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या दोन दिवसीय दुबईच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान ते संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शन अंतर्गत आयोजित यूएन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स (UNCC) मधील पक्षांच्या २८ व्या परिषदेला (COP28) उपस्थित राहणार आहेत. तसेच ते इतरही तीन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत ज्यापैकी दोन कार्यक्रम भारताकडून सहआयोजित करण्यात आले आहेत. भारत आणि यूएई ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह लाँच करत आहे, असेही परराष्ट्र सचिवांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. (Cop28 dubai)

Cop28 dubai : जागतिक हवामान बदलासंदर्भातील 'या' मुद्द्यांवर चर्चा

संयुक्त राष्ट्राच्या कॉप परिषदेत हवामान संदर्भातील अनेक गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या संवादामध्ये हवामान बदलाचे दुष्परिणाम, जीवाश्म इंधनाचा वापर, मिथेन आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आर्थिक मदत आणि देण्यात येणारी भरपाई या मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. (Cop28 dubai)

जगभरातील २०० देशांचे नेते होणार सहभागी

जीवघेणी उष्णता, दुष्काळ, जंगलातील आग, वादळ आणि पूर यांचा जगभरातील जीवनमान आणि जीवनावर परिणाम होत आहे. या मुद्यांवर संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषदेत चर्चा होणार आहे. २०२१-२२ मध्ये जागतिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन विक्रमी पातळीवर पोहोचले होते. त्यातील ९० टक्के जीवाश्म इंधनामुळे झाले होते. कॉप-२८ (COP-28) दरम्यान याविषयावरही चर्चा होणार आहे. जगभरातील राजा चार्ल्स तिसरा, पोप फ्रान्सिस आणि जवळपास 200 देशांचे नेते या मुद्द्यांवर ठळकपणे लक्ष देणार आहेत. १ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भारताकडून या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. (Cop28 dubai)

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news