file photo
file photo

Congress : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शनिवारी राहुल गांधींना भेटणार

Published on
पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली, दि. 14, Congress :  महाराष्ट्रात आगामी काळात काढल्या जाणाऱ्या बस यात्रा, नेत्यांच्या संपर्क यात्रा तसेच राजकीय मुद्द्यावर वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीत आले असून शुक्रवारी त्यांनी सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांची भेट घेतली. दरम्यान शनिवारी ते राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे समजते.
काँग्रेसच्या तीसपेक्षा जास्त नेत्यांनी चारच दिवसांपूर्वी दिल्ली दौरा करून राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच राहुल गांधी यांना भेटून भविष्यातील वाटचालीबाबत खल केला होता. त्यावेळी राज्यातून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी नेत्यांनी कामाला लागावे, असे  निर्देश खर्गे यांनी दिले होते. तर राहुल गांधी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या प्रदेश दौऱ्याचा निर्णय घेण्यात आला होता. चालू वर्षाच्या अखेरीस भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर बस यात्रा काढण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा सांगितलेला आहे. या पदासाठी विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. सदर मुद्द्यावर पटोले आणि राहुल गांधी यांच्या दरम्यान खलबते होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news