

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आणखी एक यादी आज (दि. २१) जाहीर केली. काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत ११ उमेदवारांचा समावेश असून, त्यामध्ये ९ उमेदवार आंध्र प्रदेशचे तर २ उमेदवार झारखंडचे आहेत.
लोकसभा निवडणूक २०२४ चा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी झाला. त्यानंतर देशभरामध्ये दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान काँग्रेसने आंध्र प्रदेश आणि झारखंड मधील एकूण ११ उमेदवारांची लोकसभेसाठी यादी जाहीर केली. या यादीत झारखंडच्या गोड्डा मतदारसंघातून दीपिका सिंह पांडे यांच्या जागी प्रदीप यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उमेदवार राज्य मतदारसंघ
डॉ. पेदादा परमेश्र्वरराव आंध्रप्रदेश श्रीकाकुलम
बॉबिली श्रीनु आंध्रप्रदेश विजीयानगरम
जंगा गौतम आंध्रप्रदेश अमालापुरम
गोलू कृष्णा आंध्रप्रदेश मछलीपट्टणम
वल्लुरू भार्गव आंध्रप्रदेश विजयवाडा
सुधाकर रेड्डी आंध्रप्रदेश ओंगोल
जंगिती लक्ष्मी नरसिंह यादव आंध्रप्रदेश नंदल
मल्लिकार्जुन वज्जला आंध्रप्रदेश अनंतपुर
बी ए समद शाहीन आंध्रप्रदेश हिंदुपुर
प्रदीप यादव झारखंड गोड्डा
यशस्विनी सहाय झारखंड रांची
हेही वाचा :