

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रकूल स्पर्धा २०२२ मध्ये आज भारताने पदकांची लयलूट सुरुच ठेवली. बॉक्सिंगमध्ये तर कमालच झाली. बॉक्सिंगमध्ये नीतू गंघासने सुवर्ण पदकाला गवसणी घातली यानंतर अमित पांघलनेही सुवर्ण पदक पटकावत बर्मिंगहॅममध्ये तिरंगा फडकावला.
राष्ट्रकूल स्पर्धा २०२२ मध्ये आज भारताच्या महिला खेळाडूंनी कमाल केली. एकीकडे महिला हॉकी संघाने न्यूझीलंडवर मात करत कांस्य पदक पटकावले. तर दुसरीकडे बॉक्सिंगमध्ये नीतू गंघासने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. यानंतर 48 किलाे वजन गटात अमित पांघल याने इंग्लंडच्या मॅकडोनाल्डच्या 5-0 असा पराभव करत भारताला बॉक्सिंगमध्ये सलग दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. हे या स्पर्धेतील भारताचे १५ वे सुवर्णपदक ठरले आहे. एकूण पदकांची संख्या ४२ झाली आहे. भारताने ११ रौप्य आणि ११ कांस्य पदक पटकावली आहेत.