

बीजिंग : जग फार मोठं आहे आणि इथे तुम्हाला अनेक विचित्र गोष्टी पाहायला मिळतील. जगाच्या कानाकोपर्यात आपल्याला विविध प्रकारचे प्राणी, विविध शैलीचे लोक आणि त्यांच्या खाण्याच्या Cockroach farming सवयी पाहायला मिळतात. प्रांता-प्रांतानुसार खाण्याच्या सवयींमध्ये खूप बदल होतो. जगातील काही लोक शाकाहारी आहेत, तर काही लोक मांसाहारी.
बर्याच जणांचे खाण्याचे पदार्थ असे असतात ज्यांची कल्पना करणे देखील कठीण असते. साप, कीटक यांचे सेवन करणारे लोक देखील जगात आहेत. आता साप आणि कीटक त्यांचे खाद्यपदार्थ असतील तर त्यांचा पुरवठा असणे देखील आवश्यक आहे आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी साप आणि कीटकांचीही शेती केली जाते. चीनमधील लोकांचा आहार Cockroach farming हा जगभरातील लोकांच्या चर्चेचा विषय असतो. याच देशात खाण्यासाठी म्हणून झुरळांचीही 'शेती' केली जाते. अर्थात त्यांची पैदास केली जाते!
मधासाठी मधमाश्या पाळल्या जातात, त्याच पद्धतीने कीटकांचीही शेती केली जाते. चीनमधील लोकांसाठी हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. जसं भारतात मत्स्य शेती केली जाते, मधुमक्षिका पालन केलं जातं, कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म उभारले जातात, तशाच प्रमाणे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कीडे-कीटक पाळले जातात. चीनमध्ये लोक कीटकांना Cockroach farming प्रोटिन्सचा मुख्य स्रोत मानतात, म्हणून ते मोठ्या संख्येने किडे पाळतात आणि ते स्नॅक्स किंवा स्टार्टर म्हणून खाल्ले जातात. चीनमध्ये अगदी लहान मुलांना देखील कीटक खायला दिले जातात आणि लहान मुलंसुद्धा मजा घेत कीटकांची चव चाखतात.
हेही वाचा :