पुणेकरांना दिलासा ! सीएनजी आणि पीएनजी एवढ्या रुपयांनी स्वस्त; घ्या जाणून नवे दर

पुणेकरांना दिलासा ! सीएनजी आणि पीएनजी एवढ्या रुपयांनी स्वस्त; घ्या जाणून नवे दर

Published on

पुणे : केंद्रीय मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार 8 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून सीएनजीचे (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) दर 6 रुपयांनी, तर पीएनजीचे (पाइप नॅचरल गॅस) दर 5 रुपये 70 पैशांनी कमी करण्यात आले आहेत. पुणे, पिंपरी- चिंचवड, तळेगाव, हिंजवडी येथे हे दर लागू करण्यात आले आहेत.

एमएनजीएलच्या वतीने याबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. याआधी पुण्यात सीएनजीचे दर 92 रुपये इतके होते. आता नवीन दरानुसार सीएनजी 86 रुपये प्रतिकिलो मिळणार आहे, तर पीएनजी 57 रुपयांवरून 51 रुपये 30 पैशांना मिळणार आहे. त्यामुळे रिक्षाचालक आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news