

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना श्रद्धांजली वाहिली. (Sulochana Latkar) सुलोचना यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. निधनानंतर त्यांचे पार्थिव त्यांचे निवासस्थान 'प्रभा देवी' येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. माहितीनुसार, सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येईल. (Sulochana Latkar) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार शिवाजी पार्कमध्ये केले जाईल.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ट्विट करून लिहिलंय, 'सुलोचनाजी यांच्या निधनाने भारतीय सिनेमामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्याच्या अविस्मरणीय कामगिरीने आपली संस्कृती समृद्ध केली. त्यांचा सिनेमॅटिक वारसा त्यांच्या अभिनयातून जिवंत राहील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना. ओम शांती.'