टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीमुळे नागरिक हैराण झाले असून त्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एनसीसीएफ कडून सांगण्यात आले. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील नोएडा येथे रजनीगंधा चौकात, तर ग्रेटर नोएडा येथे मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून टोमॅटोची विक्री केली जाईल. एनसीसीएफ कडून अशाच प्रकारे उत्तर प्रदेशातील लखनौ, कानपूर आणि राजस्थानमधील जयपूर येथेही टोमॅटोची विक्री केली जाणार आहे. (Tomato prices are low)