Church attacked in Pakistan: पाकमधील फैसलाबादेमध्‍ये हिंसाचार भडका, चर्चची जाळपाेळ

Church attacked in Pakistan
Church attacked in Pakistan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: पाकिस्तानातील फैसलाबादेत आज सकाळी जातीय संघर्षातून हिंसाचाराचा भडका उडला. हिंसक जमावाने फैसलाबाद येथील ख्रिश्चन समुदायाच्‍या नागरिकांसह चर्चची जाळपोळ केली असल्याची माहिती येथील स्थानिक माध्यमांनी (Church attacked in Pakistan) दिल्याचे 'बीबीसी'ने म्हटले आहे.

या घटनेनंतर फैसलाबाद जिल्ह्यातील सुरू असलेल्या हिंसाचारानंतर जमावाने चर्चला आग लावली. याशिवाय ख्रिश्चन कॉलनी आणि परिसरातील काही सरकारी इमारतींचीही तोडफोड केली. दरम्यान या भागात हिंसक वातावरण निर्माण झाले असून, तणाव वाढला आहे, असेही माध्यमांनी (Church attacked in Pakistan) म्हटले आहे.

बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.१६) सकाळी फैसलाबाद जिल्ह्यातील इसा नगरी भागात सोशल मीडियावरील मेसेजमधून तणाव वाढला.  निदर्शने सुरू झाली, काही मिनिटांमध्‍येच हिंसाचाराचा भडका उडला. यावेळी जमावाने ख्रिश्चन वस्तीत दगडफेक, जाळपोळ केली.

जरावाला येथील एका पोलिस अधिकारी शौकत मसीह याने बीबीसीशी बोलताना सांगितले की, सकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान संतप्त आंदोलकांनी आग लावल्याची माहिती मिळाली. संतप्त आंदोलक हातात लाठ्या घेऊन होते. झरनवालाच्या सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयावरही अशाच एका हिंसक जमावाच्या गटाने हल्ला केल्याचे म्‍हटले आहे.

Church attacked in Pakistan: बिशप यांनी केली कारवाईची मागणी

हिंसाचारानंतर चर्च ऑफ पाकिस्तानचे अध्यक्ष बिशप आझाद मार्शल यांनी निराधार आरोप करून ख्रिश्चन समुदायाच्‍या नागरिकांवर अत्याचार केले जात आहेत. येथील चर्चची इमारत जळत आहे. आम्ही न्यायासाठी उभे आहोत. कायदा आणि सुव्यवस्था आणि न्याय मिळवून देण्याचे सरकारकडे आवाहन करत आहोत. न्यायीक संस्थांनी या प्रकरणी पावले उचलावीत, असे म्हणत चर्च आणि ख्रिश्चन समुदायावर हल्ले करणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.  नागरिकांच्या संरक्षणाची देखील मागणी त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून पाकिस्‍तान सरकारकडे केली आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news