नाताळ : प्राक्तन घडविणारा प्रभू येशू

नाताळ : प्राक्तन घडविणारा प्रभू येशू
Published on
Updated on

सालोमन राजा म्हणतो, 'लोक निर्णय घेण्यासाठी फासे टाकतात; पण निर्णय नेहमी देवाकडून येतात (नितीसुत्रे 16:33).' जे ईश्वराने योजिले आणि जे बदलत नाही ते प्राक्तन. परमविधाता, जगन्नियंता, जगत्पालक परमेश्वर भूतलावरील सर्व जीवांच्या जीवनाचे प्राक्तन जसे लिहून ठेवतो, तसेच त्याने स्वतःच्या जीवनाचे प्राक्तनही लिहून ठेवले होते. त्या प्राक्तनानुसार प्रभू येशूच्या जन्माचा प्रमुख उद्देश मानवाचे आत्मिक तारण करणे हा जसा होता त्याचप्रमाणे प्रीती, क्षमा, बंधुभाव, न्यायी वृत्ती, दया, सेवाभाव व त्याग या मानवी मूल्यांची प्रात्यक्षिकासह शिकवण देणे हासुद्धा होता. ख्रिस्ताच्या जीवनाचा आढावा घेतल्यास आपल्याला ते सहज दिसून येते. उदा. संपूर्ण मानव जातीच्या पापक्षमेसाठी ख्रिस्ताने भोगलेल्या यातना व क्रुसावर केलेले आत्मसमर्पण. तसेच, ज्यांनी येशूला क्रुसावर मारले त्यांना प्रभू येशूंनी त्याच क्रुसावर मरताना क्षमा केली. अशा उदात्त हेतूने नियोजिलेले हे प्रभू येशूचे प्राक्तन त्याच्या जन्माअगोदर काही संदेष्ट्यांनी इसवी सन सुरू होण्यापूर्वीच्या सहस्रकात लिहिले होते. तो मनुष्यदेहातील ईश्वर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याला हिब्रू भाषेत इमान्युएल म्हणतात. त्याचा अर्थ जगाच्या इतिहासात मानवासह वावरलेला असा कालातीत, सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान देव, असे म्हटले आहे. दोन हजार वर्षांपूर्वी त्याच्या जन्मापासूनच इसवी सनाची म्हणजेच कालगणनेची सुरुवात झाली.

इ. स. पू. 1410 मध्ये जन्म झालेला मोशे (चेीशी), नंतर चारशे वर्षांनी इस्रायलवर राज्य करणारा दाविद (ऊर्रींळव) राजा, दाविद राजाचा पुत्र शलमोन (डेश्रेोप) ज्याने जेरुसलेमाचे भव्य मंदिर बांधले. त्यानंतर चारशे वर्षांनी यीर्मया (गशीशाळरह), इ. स. पू. 740 ते 680 हा यशया (खीरळरह) या प्रमुख संदेशष्ट्याचा काळ होता. यशयाच्या समकालीन असलेले होशे आणि मिखा, पुढे इ. स. पू. चौथ्या व पाचव्या शतकादरम्यान हग्गय, जकेरिया व मलाखी यांनी व इतर काही संदेष्ट्यांनी येशू जन्माचे ईश्वरी नियोजन अगोदरच लिहून ठेवले होते.

ख्रिस्त हा अब्राहमाच्या वंशात जन्माला येईल, असे मोशेने उत्पतीच्या (ॠशपशीळी) पुस्तकात लिहिले होते. त्याप्रमाणे अब्राहमाचा वंशज जोसेफ याच्या कुटुंबात पवित्र मरियेच्या पोटी येशूचा जन्म झाला. अब्राहमाची वंशावळ संत मतयाच्या पुस्तकात सुरुवातीलाच दिली आहे. अब्राहमाच्या वंशात जन्म घेणारा ख्रिस्त हा सार्वकालिक राजा म्हणजेच परमेश्वर आहे, असेही त्यांनी वर्तविले.

ख्रिस्ताचा जन्म कुमारिकेपोटी होईल, असे यशयाने लिहिले होते. देवदूत गॅब्रिएल तिच्याकडे आला आणि म्हणाला, 'अभिवादन! तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभू तुझ्याबरोबर आहे.' परंतु, या शब्दांनी ती अस्वस्थ झाली आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा, याचे ती नवल करू लागली. देवदूत तिला म्हणाला, 'मरीये भिऊ नकोस. देवाने तुझ्यावर कृपा केली आहे. ऐक! तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल, त्याचे नाव तू येशू ठेव. तो महान होईल व त्याला सर्वोच्च देवाचा पुत्र म्हणतील. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि सर्वोच्च देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल.'

ख्रिस्ताचा जन्म बेथलेहेममध्ये होईल, असे सारे मिखा संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिले होते. त्या दिवसात रोमन सम्राट कैसर औगुस्तकडून जगातील पहिल्या नाव नोंदणीचा हुकूम झाला होता. मग, योसेफसुद्धा गालीलातील नासरेथ गावाहून यहुदीयातील दाविदाच्या बेथलेहेम गावी गेला. कारण, तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता. जिच्याशी त्याचे लग्न ठरले होते व जी गरोदर होती, त्या मरीयेसह तो तेथे नावनोंदणीसाठी गेला. ते तेथे असतानाच तिची बाळंतपणाची वेळ आली आणि तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला.

येशूच्या जन्मानंतर पूर्वेकडील देशाकडून काही ज्ञानी लोक नुकताच जन्मलेला विश्वाचा राजा कोठे आहे, याचा माग काढीत आले होते. कारण, ईश्वराचा मानव देहातील जन्म सूचित करणारा तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता. त्या तार्‍यानेच त्यांना मार्ग दाखवला. ज्ञानी लोक बाळ होते त्या गोठ्यात आले. त्यांनी बाळ व त्याची आई मरिया हिला पाहिले. त्यांनी लवून त्या बालकाला नमन केले. नंतर त्यांनी बाळासाठी आणलेल्या भेटवस्तू काढल्या. एकाने सोने अर्पण केले. कारण, येशू राजा होता. दुसर्‍याने धूप अर्पण केला. कारण, येशू परमेश्वर होता. तिसर्‍याने गंधरस अर्पण केला. कारण, येशूच्या सर्वांगावर जखमा होणार होत्या. मग, ते माघारी निघून गेले. अशाप्रकारे ईश्वराने स्वजन्माचे नियोजित केलेले प्राक्तन पूर्ण झाले. सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

– डॉ. मार्यान रॉड्रिक्स

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news