

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चीनवर सध्या कर्जाचा बोझा वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. झीरो कोविड पॉलिसीमुळे चीनमधील आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. बँक फॉर इंटरनॅशनल (बीआईएस) या संस्थेच्या अहवालानुसार चीनच्या गैर-बँकींग क्षेत्रांवरील कर्जाचा आकडा ५१.८७ ट्रिलियन इतका झाला आहे. कर्जाची एकूण रक्कम पाहता चीनच्या जीडीपीच्या एकूण टक्केवारी पेक्षाही अधिक आहे. विशेष म्हणजे चीनवर १९९५ नंतर पहिल्यादाच एवढा कर्जाचा बोझा पहायला मिळाला. (China Economy)
बीजिंगमधील थिंक टँक नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर फायनान्स अँड डेव्हलपमेंट या संस्थेच्या अहवालानुसार 2020 यावर्षीच चीनवरील कर्जाने उच्च पातळी गाठलेली होती. मात्र आता याच कर्जाच्या पातळीने अजून उच्चांकी गाठलेली आहे. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाकाळ हे या कर्ज वाढीमागचे कारण आहे. सरकारचा सामाजिक सुरक्षेवरील खर्च वाढत चालला आहे. यासाठी कर्ज काढून संसाधने उभारावी लागतील, अशी भीती व्यक्त होत आहे. (China Economy)
संस्थेशी संबंधित तज्ञांच्या मते, देशातील विविध शहरांमध्ये लागू केलेल्या लॉकडाऊनचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर खूप वाईट परिणाम झाला आहे. या वर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत चीनचा आर्थिक विकास दर केवळ 0.4 टक्के होता. आर्थिक मंदीच्या काळात चीन सरकारने पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. यासाठी यावर्षी चीनला नवीन कर्ज घ्यावे लागेल.
हेही वाचा