Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray appeal : उद्धव ठाकरेंची बंडखोरांना भावनिक साद, म्‍हणाले ” तुम्ही आजही…”

Published on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो की, अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे की, आपण मुंबईत या. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. तुम्ही आजही मनाने शिवसेनेतच आहात, अशी भावनिक साद बंडखोरांना मुख्यंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घातली आहे. ( Uddhav Thackeray appeal )

आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो

मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्‍हटलं आहे की, , तुम्ही गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. आपल्यातील बरेच जण संपर्कातही आहेत. त्यामुळेच तुम्ही आजही मनाने शिवसेनेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करत बंडखोर शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे.

Uddhav Thackeray appeal :  आजही मला तुमची काळजी वाटते

शिवसेना पक्षप्रमुख आणि तुमचा कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटते. तुम्ही मुंबईत येऊन माझ्यासमोर बसा, बोला आपण मार्ग काढू. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल. कोणाच्याही कोणत्याही भूल-थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तरच मार्ग निघेल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news