'Eknath Shinde
'Eknath Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौर्‍यावर

Published on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (दि. 8) कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर आहेत. त्यांच्यासमवेत पालकमंत्री हसन मुश्रीफही विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सकाळी 9.45 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे त्यांचे आगमन होईल.

सकाळी सव्वादहा वाजता ते कोरोची (ता. हातकणंगले) येथे आयोजित महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला मेळावा व अन्य कार्यक्रमांना उपस्थित राहतील. यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजी, जिल्ह्यातील महसूल अधिकारी यांना वाहनवाटप, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन आदी कार्यक्रम त्यांच्या हस्ते होणार आहेत.

माणगाव (ता. हातकणंगले) येथे दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या संयुक्त स्मारकाचे लोकार्पण, पेठवडगाव येथील कार्यक्रमास उपस्थित राहून ते सांगली जिल्ह्याकडे रवाना होणार आहेत. दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी ते सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर विमानतळावर येणार असून, तेथून ते मुंबईला रवाना होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news