

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री ऋतुजा धारप यांचे लग्नाचे नवे फोटो समोर आले आहेत. २२ एप्रिल, २०२४ रोजी हे दोघे कलाकार विवाहबद्ध झाले होते. याआधी चेतन आणि ऋतुजाने इन्स्टाग्रामवर अधिकृत अकाऊंटवर लग्नाचे फोटोज शेअर केले होते. आता आणखी नवे फोटो समोर आले आहेत. ऋतुजाने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. (Chetan Vadnere-Rutuja Dharap Wedding Photos) तर चेतन शाही लूकमध्ये दिसतो आहे. (Chetan Vadnere-Rutuja Dharap Wedding Photos)
चेतन वडनेरेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवे फोटोज शेअर करत Wedding portraits ? अशी कॅप्शन लिहिलीय.
चेतन वडनेरे हा सध्या 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत 'शशांक' ही व्यक्तिरेखा साकारली होती. ऋतुजा धारप हिने'जाऊ नको दूर बाबा' या मालिकेत भूमिका साकारली होती.