ChatGPT : ‘चॅटजीपीटी’ला ‘गुगल’च्या ‘बार्ड’ची स्पर्धा

ChatGPT
ChatGPT
Published on
Updated on

वॉशिंग्टन : सध्याचा जमाना कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच 'एआय' (आटिफिशियल इंटेलिजन्स) चा आहे. अनेक कंपन्या आपले 'एआय चॅटबॉट' सादर करीत आहेत. अमेरिकेतील एआय स्टार्टअप कंपनी असणार्‍या 'ओपनएआय' या कंपनीने आपला 'चॅटजीपीटी' हा चॅटबॉट लाँच केला आहे. हा एक कृत्रिम चॅटबॉट आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देते. आता 'गुगल' ने देखील आपला 'एआय बार्ड' हा चॅटबॉट लाँच केला आहे. हा चॅटबॉट अनेक देशांमध्ये 'चॅटजीपीटी'ला टक्कर देत आहे.

'बार्ड' चॅटबॉट हा 180 देशांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तसेच उर्वरित देशांमध्ये लवकरच 'बार्ड' सुरू होणार असल्याचे 'गुगल'ने सांगितले आहे. सध्या वापरकर्त्यांना एआय बार्डमध्ये इंग्रजी, जपानी आणि कोरियन या तीनच भाषांचा सपोर्ट मिळणार आहे. लवकरच याला अन्य भाषांचा देखील सपोर्ट मिळणार आहे. आता बार्डचे लाँचिंग झाल्यामुळे 'चॅटजीपीटी' आणि 'बार्ड' या दोन्ही चॅटबॉटची तुलना सुरू झाली आहे. आज आपण अशा गोष्टी जाणून घेणार आहोत जे बार्ड करू शकते; पण चॅटजीपीटी करू शकत नाही. सध्या 'चॅटजीपीटी'च्या वापरकर्त्यांना इंटरनेटचा वापर करण्यास परवानगी देत नाही. मात्र, बार्ड तुमच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर करतो. यामुळे अधिक माहितीसह बार्ड तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो.

'गुगल'ने आपल्या इव्हेंटमध्ये सांगितले होते, बार्डला जी-मेलसह इंटिग्रेट केले जाणार आहे. ज्यामुळे 'अ‍ॅप' मध्येच तुम्ही जी-मेल सहजपणे लिहू शकता. तर चॅटजीपीटी सध्या कोणत्या ई-मेल अ‍ॅप्लिकेशनसह इंटिग्रेट करत नाही. जी-मेलसह अपकमिंग इंटिग्रेशनशिवाय बार्ड आधीच वापरकर्त्यांना जनरेटेड कंटेंटला जी-मेल आणि गुगल डॉक्समध्ये एक्स्पोर्ट करण्याची परवानगी देते. यातून जनरेट होणारा कंटेंट वापरणे तुम्हाला सोपे ठरू शकते. मात्र, 'चॅटजीपीटी'चा वापर करताना तुम्हाला फक्त कंटेंट कॉपी करता येतो. इतर गुगल अ‍ॅप्स तुम्ही बार्डला प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही व्हॉईस प्रॉम्प्टचा वापर करू शकतो. जे सध्या चॅटजीपीटीसह शक्य नाही.

व्हॉईस प्रॉम्प्ट हे वापरण्यासाठी सोपे असते. यामध्ये तुम्ही टाईप न करता प्रश्न विचारू शकता. बार्ड हे इंटरनेटशी जोडलेले आहे. त्यामुळे ते तुम्हाला नवीन माहिती पुरवू शकते. सध्या चॅटजीपीटी हे सप्टेंबर 2021 पर्यंत मर्यादित आहे. बार्ड हे व्यावसायिक आणि विद्यार्थी यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकते कारण ते तुम्हाला लेटेस्ट माहिती पुरवते. गुगलचे बार्ड 20 पेक्षा जास्त प्रोग्रामिंग भाषांना सपोर्ट करते. हे फक्त एका लिंकचा वापर करून प्रोग्रामबद्दल माहिती मिळवता येऊ शकते. चॅटजीपीटी हे कोडिंगमध्ये चांगले आहे मात्र त्याला तुम्ही लिंक दिल्यास ते तुम्हाला प्रोग्रॅम एक्सप्लेन करू शकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news