2024 साठी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीसच : चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे
Published on
Updated on

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : 2024 चे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असे सांगताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यात भाजप मजबूतपणे उभा आहे, असे नमूद केले. कोणतीही जागा कोणी लढवावी हे ठरायचे आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल, असे सांगत त्यांनी ठाण्याच्या जागेचा सस्पेन्स वाढविला. यावर बोलतांना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाणे आमचे आहे, जसे निर्णय होतील, तसे तुम्हाला सांगू अशी सावध प्रतिक्रिया दिली.

भाजपाच्या महाविजय 2024 अभियानातर्गत मंगळवारी ठाण्यात आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मोठे शक्तिप्रदर्शन केले. गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातनंतर जिल्हा परिषद ते सेंजॉन शाळेपर्यंत पायी पदयात्रा काढण्यात आली. यावेळी ढोल, ताशांसह भाजपचे शेकडो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर सेंजॉन शाळेजवळ चौक सभेचे आयोजनही करण्यात आले होते.

त्यापूर्वी गडकरी रंगायतनमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना कोण कुठे उभा राहणार, कोणती जागा कोणाला मिळणार यांचा निर्णय तीनही पक्षाचे नेते घेतील मात्र प्रत्येक जागेची जबाबदारी भाजपचीच अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

भाजपाच्या महाविजय 2024 अभियानातर्गत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचे दौरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news