

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणेकर राजकीय नेत्यांची खेचाखेची करण्यातही अजिबात मागे नाहीत. असाच प्रत्यय खुद्द पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांतदादांनाही आला. पुण्यात एका कार्यक्रमासाठी चंद्रकांत दादांची कार्यक्रमस्थळी एंट्री झाली आणि तोच स्पीकरवर 'राष्ट्रवादी पुन्हा' हे गाणं वाजू लागलं.
अचानक झालेल्या या घटनेने उपस्थितांमध्येही खळबळ माजली. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत या डीजेला ताब्यात घेतलं. या प्रकरणात कुजबूज काहीही होत असली तरी पोलिसांनी मात्र डीजेला परवानगी नसल्याचं कारण देत अटक केली आहे.