Regulation for Coaching Classes : केंद्र सरकारची कोचिंग क्लासेससाठी नवीन नियमावली

Regulation for Coaching Classes : केंद्र सरकारची कोचिंग क्लासेससाठी नवीन नियमावली
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Regulation for Coaching Classes : केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने खासगी कोचिंग क्लासेससाठी नियमावली जाहीर केली आहे. या अंतर्गत शिकवणी वर्ग १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाहीत. तसेच विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सर्वसमावेशकता, अशा गोष्टी लक्षात घेऊन नियमावली तयार करण्यात आली आहे.

नियमावलीच्या पत्रात केंद्र सरकारने नियमबाह्य पद्धतीने वाढणाऱ्या खासगी कोचिंग क्लासेसच्या समस्यासुद्धा मांडल्या आहेत. तसेच या नियमावलीत शिकवणी वर्गातील शुल्क, वर्ग खोली, वेळा, क्लासेसची जाहिरात इत्यादींबाबत सविस्तर नियम जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येची प्रकरणे, कोचिंग क्लासेसमधील भरमसाठ शुल्क आणि मानसिक दडपण या पार्श्वभुमीवर तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जाहिर करण्यात आली आहेत. (Regulation for Coaching Classes)

खासगी कोचिंग क्लासेस साठीच्या नियमावलीत काय?

  • एका बॅचमध्ये किती विद्यार्थी असतील, याचा स्पष्ट उल्लेख माहितीपत्रकात आणि संकेतस्थळावर असावा. कोचिंग क्लासेसमधील शिक्षकाची पात्रता किमान पदवीधर असावी. गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकांना कार्यरत ठेवता येणार नाही.
  • वसतिगृहाची सुविधा आणि त्यासाठी आकारले जाणारे शुल्क यांचा अद्ययावत तपशील द्यावा.
  • १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांची नोंदणी शिकवणी वर्गात करता येणार नाही किंवा माध्यमिक शालान्त परीक्षेनंतरच नोंदणी करता येईल. कोचिंग क्लासचा शाळेतील उपस्थितीवर परिणाम होऊ नये, साप्ताहिक सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी कोणतीही मूल्यमापन-चाचणी किंवा परीक्षा होणार नाही, याची काळजी घ्यावी. (Regulation for Coaching Classes)
  • विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक वातावरण, सांस्कृतिक राहणीमान, वास्तविकता, शालेय परीक्षांची तयारी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी यांतील फरक यांविषयीची जागरूकता निर्माण केली जाईल.
  • विद्यार्थ्यांवर भविष्याविषयीचा ताण येऊ नये म्हणुन अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशांसह नोकरीचे अन्य पर्याय विद्यार्थ्यांना माहिती करून दिले जातील.
  • विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे मूल्यमापन करण्यासाठी मॉक टेस्ट घेतली जाऊ शकते. विद्यार्थ्यांच्या क्षमतेविषयी असणाऱ्या अपेक्षा पालकांकडे व्यक्त करू शकतात. त्याविषयीचे आगामी पर्याय आणि मार्ग क्लासेसने सुचविणे अपेक्षित आहे.
  • कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश मिळाला म्हणजे वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायदा, व्यवस्थापन यांसाठी प्रवेश मिळेलच किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेलच, याची खात्री नाही. ही जाणीव विद्यार्थी आणि पालकांना करून दिली जाईल.
  • कोचिंग क्लासेसने मानसोपचार तज्ज्ञांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याविषयी वेळोवेळी कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत. कोचिंग क्लासेस एका दिवसात ५ तासांपेक्षा जास्त वेळ वर्ग घेऊ शकत नाहीत. आणि कोचिंगची वेळ सकाळी लवकर किंवा संध्याकाळी खूप उशीरा नसावी.
  • कोचिंग क्लासेसने घेतलेल्या मूल्यमापन चाचणीचा निकाल त्यांनी सार्वजनिक करू नये. मूल्यमापन चाचणीचे निकाल गोपनीय ठेवून, त्याचा वापर विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या नियमित विश्लेषणासाठी करण्यात यावा.
  • विविध अभ्यासक्रमांसाठी आकारले जाणारे शिक्षण शुल्क योग्य, वाजवी असेल आणि आकारण्यात येणाऱ्या शुल्काच्या संबंधित पावत्या उपलब्ध करून द्याव्यात.
  • विद्यार्थ्याने जर मध्येच कोर्स सोडला, तर उर्वरित रक्कम १० दिवसांच्या आत परत करणे कोचिंग क्लासेसना बंधनकारक असेल. विद्यार्थी जर वसतिगृहात राहत असेल तर वसतिगृहाच्या शुल्काचा देखील यात समावेश असेल.TTY IMAGES
  • एकदा विद्यार्थ्याने नाव नोंदणी केली तर त्यावर आधारित शुल्क आणि अभ्यासक्रम यांमध्ये वाढ करता येणार नाही. संबंधित प्रदेशातील महत्त्वाच्या आणि लोकप्रिय सणांच्या वेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधता येईल, अशा पद्धतीने कोचिंग क्लासेसने सुट्ट्या द्याव्यात.
  • कोचिंग क्लासेसच्या इमारतीत आगरोधक यंत्रणा असावी. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रथमोपचार पेटी आणि वैद्यकीय सुविधा असणे बंधनकारक असेल. कोचिंग क्लासेसमधील प्रत्येक वर्गखोली हवेशीर असावी, तिथे पुरेसा सूर्यप्रकाश असावा. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, तक्रार पेटी, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news