Mansukh Mandvia : कोरोनाच्या आणखी दोन लसींना आणि एका गोळीला केंद्राची मान्यता

Mansukh Mandvia : कोरोनाच्या आणखी दोन लसींना आणि एका गोळीला केंद्राची मान्यता
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन

केंद्र सरकारने कोरोनाच्या दोन लसींना आणि एका एंटी-व्हायरल गोळीला आपतकालीन वापराकरिता मंजूरी दिली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandvia) यांनी मंगळवारी सकाळी ट्विट करून याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, "कोरोनावरील कोर्बेव्हॅक्स (Corbevax) आणि कोवोव्हॅक्स (Covovax) या लसींना, त्याचबरोबर एंटी-व्हायरल मोलनुपीरावीर (Molnupiravir) नावाच्या गोळीला मान्यता देण्यात आली आहे.

मनसुख मांडविया पुढे ट्विटमध्ये असं म्हणतात की, "कोर्बेव्हॅक्स ही लस भारताची पहिली स्वदेशी RBD प्रोटीन सब-युनिट लस आहे. ही लस भारतात विकसीत झालेली तिसरी लस आहे. याची निर्मिती हैदराबादमधील बायोलाॅजिकल-ई या कंपनीने केली आहे. नॅनोपार्टीकल लस कोवोव्हॅक्स याची निर्मिती  पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून करण्यात येणार आहे."

"अँटी-व्हायरल गोळी Molnupiravir आता देशातील १३ कंपन्यांद्वारे तयार केली जाणार आहे. त्याचा वापर वयस्क कोरोना रुग्णांना आणि अतिदक्षता विभागातील रुग्णांवर आपत्कालीन परिस्थितीत ठरवून दिल्याप्रमाणे नियमांप्रमाणे केला जाणार आहे. कोरोनावरील औषधांना मंजूरी दिल्यामुळे महामारीविरोधातील लढाई आणखी मजबूत होणार आहे", असंही केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandvia) यांनी ट्विटमध्ये म्हंटलेलं आहे.

केंद्रीय औषध प्राधिकरणच्या एका तज्ज्ञ समितीने सोमवारी कोरोनावरील कोर्बेव्हॅक्स (Corbevax) आणि कोवोव्हॅक्स (Covovax) या लसींना, त्याचबरोबर एंटी-व्हायरल Molnupiravir या गोळीला काही नियमांनुसार मान्यता देण्याविषयी शिफारस केलेली होती. डीसीजीआय कार्यालयाने १७ मे रोजी एसआयआयला कोवोव्हॅक्स लसीलाच्या निर्मितीला परवानगी दिली होती. डीसीजीआयच्या मंजुरीच्या आधारावर सीरमने या लसीची निर्मिती करत आहे.

पहा व्हिडिओ : 'पाठीचा कणा कसा सांभाळाल?' विषयावर जगद्विख्यात स्पाईन सर्जन डॉ.शेखर भोजराज यांचे मार्गदर्शन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news