राज्यात कॅशलेस शासकीय आरोग्य सेवा सुरू करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात कॅशलेस शासकीय आरोग्य सेवा सुरू करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published on
Updated on

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना सुरू असलेल्या खासगी रुग्णालयात कॅशलेस आरोग्य सेवा सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे त्यांच्या वाढदिवशी केली. तसेच एमआयडीसीतील सर्व निवृत्त आणि सध्या सेवेत असलेल्या कर्मचार्‍यांसाठी विमा कवच देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

यावेळी 450 अधिकारी- कर्मचार्‍यांना पदोन्नती देऊन निवृत्त कर्मचार्‍यांसह सर्व कर्मचार्‍यांना विमा कवच देणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे येथील भूखंडावर 34 कोटी रुपये खर्चून 600 वाहने पार्किंगची व्यवस्था होईल, एवढ्या बहुस्तरीय वाहनतळाच्या इमारतीचे भूमिपूजन व मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजनेचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, एमआयडीसीचे प्रधान सचिव डॉ. बिपीन शर्मा, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, विजय राठोड, एमआयटीएलचे व्यस्थापकीय संचालक मल्लीकनेर आदी उपस्थित होते.

राज्यातील सत्तांतरानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा थेट गुंतवणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे. उद्योगांना अधिक चालना देण्यासाठी प्रशासनाने अधिक गतिमान होण्याची गरज आहे. मी झपाट्याने निर्णय घेणारा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे सरकारबरोबर प्रशासनाने वेगाने धावले पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

यावेळी उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, गेले 16 महिने हा महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आहे. हे सर्व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे शक्य झाल आहे.

मुख्यमंत्री शिंदे वाहनतळाचे स्वप्न सात वर्षानंतर सत्यात उतरत असल्याचे सांगणार्‍या उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कर्मचार्‍यांच्या पाल्यांना 350 टॅब देण्यात येणार आहे. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही पाल्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. औद्योगिक विकास महामंडळातील 450 अधिकारी, कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात आली. औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजना (मेडिक्लेम पॉलिसी) सुरू करण्यात आली. या विम्याचे हप्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरणार आहे.
प्रास्ताविक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपिन शर्मा यांनी केले.

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यात उद्योगांना चालना मिळण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध पाहिजेत. राज्यात उद्योगांना गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे. आपल्या राज्यात जास्तीत जास्त उद्योग आले पाहिजेत, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. उद्योगांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आज महाराष्ट्र एफडीआयमध्ये क्रमांक 1 चे राज्य आहे. उद्योगांसाठी असलेली ध्येय-धोरणे सुटसुटीत असली पाहिजेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news