

बाजारात येणारी चमकदार लक्झरी कार अथवा प्रत्येक महागडी दुचाकी आपण खरेदी करू शकत नसलो, तरी आपण आपल्या आवडीच्या कार अथवा दुचाकीचे डिझाईन स्वत: करू शकलो तर… आहे ना मजेदार कल्पना? Automotive Design ऑटोमोटिव्ह डिझाईन हा असा कलात्मक पैलू आहे, ज्यामध्ये विज्ञानाचेही महत्त्वाचे स्थान आहे.
ऑटोमोटिव्ह डिझायनरच्या Automotive Design रूपात कोणते वाहन आतून आणि बाहेरून कसे असावे, हे तुम्ही ठरवू शकता. या फिल्डसाठी आपल्याकडे क्रिएटिव्हिटी असणे आवश्यक आहे. कारण वाहननिर्मात्या कंपन्यांकडून सगळ्यांपेक्षा वेगळ्या असलेल्याच डिझाइन्स स्वीकारल्या जातात. ऑटोमोबाईल सेक्टरमधील तीव्र स्पर्धेमुळे नवे उत्पादन बाजारात उतरवताना खूप विचार केला जातो. इथे प्रत्येक डिझाईन इतरांपेक्षा केवळ वेगळेच नाही, तर वेळेच्या पुढचेही असावे लागते.
काय शिकावे लागेल?
हे क्षेत्र केवळ स्केचिंगपर्यंतच नाही. या क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर तुमच्याकडे एअरोडॉनेमिक्स इंजिनिअरिंग Automotive Design आणि ऑगोनॉमिक्सचेही ज्ञान असणे आवश्यक असते. गणित आणि भौतिकशास्त्राचेही ज्ञान असण्याची गरज असते. ऑटोमोटिव्ह डिझाईनच्या विद्यार्थ्यांना कटिंग एज टूल्सच्या माध्यमातून त्रिमितीय (थ्री डायमेन्शनल – थ्रीडी) प्रस्तुती देण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात चासी, इंजिन, इलेक्ट्रिकल सिस्टीम, मोटार ट्रान्स्पोर्ट, वर्कशॉप टेक्नॉलॉजीचा समावेश असतो. यात वाहन आणि त्याच्या स्पेअर पार्टस्ची डिझाईन, निर्मिती आणि मेंटेनन्सचाही समावेश होतो. अशाप्रकारे ऑटोमोटिव्ह डिझायनिंगमध्ये करिअर बनविण्यासाठी विज्ञान आणि कलेची सर्वांगीण माहिती असणे आवश्यक असते.
कुठे शिकू शकाल?
ऑटोमोटिव्ह डिझायनर Automotive Design बनण्यासाठी तुम्हाला ऑटोमोटिव्ह डिझायनिंगमध्ये बॅचलर ऑफ सायन्सची पदवी प्राप्त करावी लागेल. भारतात तुम्ही अंडरग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट स्तरापर्यंत ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग शिकू शकतात. तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स विषय घेऊन बिारावी उत्तीर्ण असाल, तर तुम्ही बीटेकही करू शकता. देशभरात अनेक शिक्षण संस्था ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग अँड डिझायनिंगमध्ये बीटेक, बीई आणि बीएससी अभ्यासक्रम चालवतात.
नोकरीच्या संधी कुठे आहेत?
ऑटोमोटिव्ह इंजिनिअर Automotive Design म्हणून तुम्ही थेट एखाद्या मोटार कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंगचा भाग बनू शकता. या क्षेत्रात सुरुवातीला मोठ्या पगाराची अपेक्षा करू नये. मात्र, एकदा स्थिर झाल्यानंतर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. सुपरव्हिजन, परफॉर्मन्स टेस्टसाठीही कंपन्यांना इंजिनिअर्सची गरज असते. तुमच्याकडे बीईसोबतच मॅनेजमेंटचीही डिग्री असेल, तर तुम्ही मार्केटिंग विभागातही एखाद्या चांगल्या पदावर नोकरी मिळवू शकता. ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट केल्यानंतर शिक्षण क्षेत्रातही करिअरच्या संधी उपलब्ध होतात.