

अनियंत्रित कार घरात घुसून झालेल्या अपघातात दोन मुली ठार झाल्या. तर दोन मुले जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री अमरावती रोडवर स्थित फुटाळा तलावाजवळ घडली. कारच्या स्फोटासारख्या आवाजाने गोळा झालेल्या लोकांनी युवतींना वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार धरमपेठ ट्रॅफिक पार्क जवळ राहणाऱ्या यादव परिवारातील काही सदस्य रविवारी रात्री जेवणासाठी दोन कारने बाहेर गेले होते. परत येत असताना फुटाळा तलावा जवळ भरत नगर टर्निंग पाॅइंट जवळ समोरची कार एका प्रतिमेला धडकल्यानंतर दुसरी कार अनियंत्रित झाली. ती एका घराची भिंत तोडून आत घुसली. पुढे ती अंगणातील झाडाला धडकली. यात समोर बसलेले कसेबसे वाचले.
परंतु मागे बसलेल्या रश्मी दीपक यादव (वय २३) व भावना मोहन यादव (वय २०) या लोखंडी खांब लागल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
[visual_portfolio id="36908"]