बेळगाव-गोवा महामार्गावर कार पलटी; महाराष्‍ट्रातील चाैघे जखमी

बेळगाव-गोवा महामार्गावर कार पलटी; महाराष्‍ट्रातील चाैघे जखमी
Published on
Updated on

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा  बेळगाव-गोवा महामार्गावर माणिकवाडीजवळ कार पलटी झाली. या अपघातात महाराष्ट्रातील चाैघे जखमी झाले. जखमींना रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना आज (दि. ११) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला.

बेळगाव-गोवा महामार्गावरील माणिकवाडी क्रॉसजवळ रस्त्याच्या अर्धवट कामामुळे कार पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलिसांच्या 112 आपत्कालीन सेवेवरील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बेळगाव येथील केएलई इस्पितळात दाखल केले आहे. बेळगाव-गोवा महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत आहे. पूल आणि मोरींचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने वाहनचालकांना धोक्यांचा अंदाज येणे कठीण झाले आहे. त्यामुळे या मार्गावर अपघात नित्याचे झाले आहेत.

हेही वाचलंत का?  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news