Heart attack: व्यायाम करताना येऊ शकतो हार्ट ॲटॅक! ‘ही’ घ्या काळजी

Heart attack: व्यायाम करताना येऊ शकतो हार्ट ॲटॅक! ‘ही’ घ्या काळजी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिध्द कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना  नुकताच हृदयविकाराचा तीव्र झटका आला.  त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. राजू श्रीवास्तव हेजिममध्ये वर्कआऊट करत असतानाच ही घटना घडली. ट्रेडमिलवर धावत असताना त्यांच्या अचानक छातीत दुखू लागले. ते खाली कोसळले. व्यायाम किंवा शारीरिक कसरती करताना हार्ट ॲटॅक येवू शकतो. हा धोका टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेवूया.

तुमचे ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रोल नियंत्रणात असले तरी, तुमचे हार्ट सुरक्षित असेलच असे काही सांगता येत नाही. काहीवेळा अनुवंशिकतेमुळेसुद्धा ह्रदया रोगाची समस्या होऊ शकते. आपली बदलेली लाईफस्टाईल देखील या गंभीर आजाराला कारणीभूत ठरू शकते, त्यामुळे दैनंदिन जीवनात व्यायाम करताना अशी घ्या तुमच्या ह्दयाची काळजी.

वाढत्या वयानुसार धोका अधिक

ह्रदयासंबंधी आजार हे व्यक्तीच्या वयावर अवलंबून असतो. नियमित व्यायाम करणाऱ्या कमी वयाच्या व्यक्तीमध्ये ह्दयरोगाचा धोका कमी असतो. परंतु वाढत्या वयाबरोबर अति व्यायाम देखील ह्दयरोगाचा धोका वाढतो. वाढत्या वयाबरोबर ब्लड फ्रेशर आणि कोलेस्ट्रोलचे प्रमाणात वाढते. त्यामुळे वाढत्या वयाच्या व्यक्तींनी नियमित चेकअप करणे गरजेचे आहे.

आपली शारीरिक क्षमता ओळखा

तज्ज्ञांच्या मतानुसार, व्यक्तीला आपल्या शारीरिक क्षमता लक्षात घेऊनच, व्यायाम करायला हवा. प्रत्येकाच्या शरीराची वेगवेगळी क्षमता असते. कित्येकवेळा शारीरिक क्षमता नसलेल्या व्यक्तीदेखील अधिक व्यायाम करून घाम गाळतात. ह्दयाच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतो. यामुळे ह्दयावर सतत ताण येऊन ह्दयावर आघात होतात आणि ह्दयाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्या शारीरिक क्षमता ओळखून शरीराला झेपेल तेवढाच व्यायाम करावा, असे तज्ज्ञ सांगतात.

अधिक वजन उचलणे टाळा

व्यायाम करताना काही जण क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलून व्यायाम करतात. तुमच्या शारीरिक क्षमता लक्षात घेत गोल निश्चित करा आणि हळूहळू वजनाची मर्यादा वाढवत जा.

'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

जेव्हा तुम्ही गंभीर आजारी पडणार असता, तेव्हा तुमचे शरीर काही संकेच देते. ज्या लोकांना हार्ट ॲटॅक येतो. यामधील कित्येक व्यक्ती हे शरीराने दिलेल्या संकेताकडे दुर्लक्ष करतात. तज्ज्ञांच्या मतानुसार हार्ट ॲटॅक येणाऱ्या १/3 व्यक्तींमध्ये एक आठवड्यांपासूनच लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिले तर हार्ट ॲटॅकची शक्यता कमी होऊ शकते. तुमचे शरीर व्यवस्थित कार्यरत नसेल, तर अधिकचा थकला, श्वास घेण्यास त्रास किंवा छातीत दुखणे अशी लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घेणे आवश्यक ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news