Byju’s Layoffs : गुगल मीटवर बोलावले आणि कामावरून काढून टाकले; 6 महिन्यात बायजूची दुस-यांदा नोकर कपात

Byju's Layoff
Byju's Layoff
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Byju's Layoffs : टेक क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे सातत्याने कंपन्यांमध्ये नोकर कपात होत आहे. बायजू या शैक्षणिक तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणा-या कंपनीने 6 महिन्यात दुस-यांदा कर्मचारी कपात केली आहे. विशेष म्हणजे बायजूचे सह-संस्थापक आणि सीईओ रवींद्रन यांनी गेल्या वेळी नोकर कपातीनंतर पुन्हा नोकर कपात होणार नाही, असे आश्वासन दिले होते. बायजूच्या नोकर कपातीबाबत मनी कंट्रोलने वृत्त दिले आहे.

मनी कंट्रोलने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की बायजूने Byju's Layoffs आपल्या कर्मचा-यांना गुगल मीटवर बोलावले आणि त्यांना नोकर कपातीची माहिती दिली. नोकर कपातीच्या या दुस-या फेरीत बायजूच्या अनेक विभागातील 1000 ते 1200 नोक-या कमी झाल्या. बायजूच्या इंजिनिअरिंग, ल्स, लॉजिस्टिक्स, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स टीममधील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. या प्रकरणाशी परिचित असलेल्या किमान तीन लोकांनी 2 फेब्रुवारी रोजी याविषयी आपल्याला सांगितल्याचे मनी कंट्रोलने म्हटले आहे.

मनी कंट्रोलने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की बायजूने Byju's Layoffs नोकर कपातीची माहिती लीक होऊ नये म्हणून कोणत्याही कर्मचा-याला याविषयी ई-मेल केले नाहीत. कारण ई-मेल लीक होण्याची भीती असते. तर बायजूने आपल्या कर्मचा-यांना गुगल मीटवर कॉलमध्ये सामील होण्यास सांगितले यावेळी त्यांना नोकर कपातीची माहिती दिली. त्यामुळे कर्मचा-यांना आपली नोकरी गेली आहे, हे गुगल मीटवर कळाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Byju's Layoffs अभियांत्रिकी संघातून, सुमारे 300 कर्मचारी काढून टाकण्यात आले आहेत. लॉजिस्टिक संघाची ताकद ऑक्टोबरपासून 50 टक्क्यांवर आली आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बायजू लॉजिस्टिक्सचे आउटसोर्सिंग करत आहे आणि त्यामुळे कंपनीने आपल्या इन-हाऊस लॉजिस्टिक टीमचा आकार 50 टक्क्यांनी कमी केला आहे.

Byju's Layoffs : बायजूची ही नोकर कपात अनेक जणांसाठी अनपेक्षित होती. कारण Byju चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) Byju रवींद्रन यांनी अनेक अंतर्गत ईमेलद्वारे कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले होते की कंपनीने गेल्या ऑक्टोबरमध्ये 5 टक्के कर्मचारी किंवा सुमारे 2,500 कर्मचाऱ्यांची कपात केल्यामुळे कंपनी कोणालाही कामावरून काढणार नाही.

तसेच ऑक्टोबरमध्ये कर्मचार्‍यांना दिलेल्या अंतर्गत ईमेलमध्ये, रवींद्रन म्हणाले, "बायजू Byju's Layoffs कामावरून काढून टाकलेल्या कर्मचार्‍यांची पुनर्रचना करण्यास प्राधान्य देईल कारण ते 'नवीन तयार केलेल्या संबंधित भूमिकांसाठी' पुनर्रचना आणि पुन्हा कामावर घेते."

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news