विधानसभेच्या सात जागांसाठी 5 सप्टेंबरला पोटनिवडणूक

विधानसभेच्या सात जागांसाठी 5 सप्टेंबरला पोटनिवडणूक
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विधानसभेच्या सात जागांसाठी येत्या 5 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक घेतली जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि. 8) दिली. ज्या जागांसाठी मतदान घेतले जाणार आहे, त्यात त्रिपुरामधील दोन आणि केरळ, झारखंड, प. बंगाल, उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.

केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचे अलिकडेच निधन झाले होते. ते प्रतिनिधीत्व करीत असलेल्या जागेसाठी मतदान होणार आहे. तर झारखंडमधील डुमरीचे आमदार जागरनाथ महातो यांचे निधन झाल्यानंतर डुमरी मतदारसंघासाठी निवडणूक घेणे आवश्यक ठरले होते.

त्रिपुरामधील ज्या दोन जागांसाठी मतदान होणार आहे, त्यातील बोक्सानगरमध्ये समसुल हक यांचे निधन झाल्याने तर धानपूरमध्ये प्रतिमा भौमिक यांनी राजीनामा दिल्याने मतदान घेणे गरजेचे ठरले होते. सात मतदारसंघात ५ सप्टेंबरला मतदान होणार असून 8 सप्टेंबरला निकाल जाहीर केला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news