

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानच्या बलुचिस्तान येथे प्रवासी बस खड्ड्यात पडून 39 जणांचा मृत्यू झाला. मधील लासबेला येथे ही दुर्घटना घडली. लसबेलाचे सहाय्यक आयुक्त हमजा अंजुम यांनी पाकिस्तानी मीडियाला या घटनेची माहिती दिली आहे. ही बस सुमारे 48 प्रवासी घेऊन क्वेटाहून कराचीला जात होती. लासबेलाजवळ यू-टर्न घेत असताना वेग जास्त असल्याने बस पुलाच्या पिलरला धडकून ती दरीत कोसळली आणि नंतर आग लागली. अंजुम यांनी सांगितले की, एका बालक आणि महिलेसह तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही यांनी व्यक्त केली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्याला सुरुवात केली. दरम्यान, इधी फाऊंडेशनचे साद इधी यांनी डॉन डॉट कॉमला सांगितले की, अपघातस्थळावरून आतापर्यंत 17 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.