पाकिस्तानात बस दरीत कोसळली; २० लोकांचा मृत्यू, अनेकजण जखमी, बचावकार्य सुरू
पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानातील एका डोंगराळ भागात पहाटे झालेल्या अपघातात बस घसरून दरीत कोसळली. बसमध्ये बसलेल्या 20 जणांचा या दुर्घटणेत मृत्यू झाला, तर 15 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उत्तर पश्चिम पाकिस्तान मध्ये आज (शुक्रवार) एक बस गिलगिट-बाल्टिस्तान भागातील डायमेर जिल्ह्यातील काराकोरम मार्गावर रावळपिंडीहून हुंजा येथे जात होती. रस्त्यात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला, ज्यामुळे बस दरीत कोसळली. बसमध्ये प्रवास करत असलेले अनेक लोक यामध्ये जखमी झाले. जवळपास १५ लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
या अपघातातील मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे कारण अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत २० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा :
- Sushma andhare | ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळले
- Lok Sabha election : लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी उज्ज्वल निकम यांचा सरकारी वकील पदाचा राजीनामा
- Mystery Of Devache Gothane : 'रहस्यमयी' देवाचे गोठणे अन् बारसूमध्ये असे आहे तरी काय? ज्याची चर्चा होतेय! (Video)

