Blockchain : जाणून घ्या ‘ब्लॉकचेन’विषयी, ज्याच्या मदतीने RBI डिजिटल चलन आणणार! | पुढारी

Blockchain : जाणून घ्या ‘ब्लॉकचेन’विषयी, ज्याच्या मदतीने RBI डिजिटल चलन आणणार!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत चौथा अर्थसंकल्प सादर केला. डिजिटल चलन आणि क्रिप्टो बूमचे भांडवल करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले की, डिजिटल अर्थव्यवस्थेला मोठी चालना देण्यासाठी डिजिटल चलन सुरू केले जाईल. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, २०२२-२३ पासून ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाच्या मदतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) डिजिटल रुपया जारी करेल. (Blockchain)

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ब्लॉकचेनसह इतर तंत्रज्ञान वापरण्या संदर्भात माहिती दिली. मात्र, इतर कोणते तंत्रज्ञान असेल याबाबत त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान कोणतीही माहिती दिली नाही. तथापि, आम्ही तुम्हाला ब्लॉकचेनबद्दल थोडक्यात सांगणार आहे. नावावरून हे स्पष्ट होते की अनेक ब्लॉक्स एकत्र करून बनवलेली ही साखळी आहे. आता या ब्लॉक्सचे काय होणार हा प्रश्न आहे. दोन व्यक्तींमध्ये बिटकॉईनचा व्यवहार झाला. अशा परिस्थितीत, बिटकॉइन्स पाठवणारा आणि प्राप्तकर्त्याशी संबंधित माहिती आणि किती बिटकॉइन्स हस्तांतरित केल्या जात आहेत, याची माहिती त्या ब्लॉकमध्ये राहील. (Blockchain)

2009 मध्ये, बिटकॉइनचे संस्थापक मानले जाणारे सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन व्यवहारांचा मागोवा ठेवण्यासाठी लेजर प्रकारचे तंत्रज्ञान वापरले, हेच तंत्रज्ञान आपण सर्वजण ब्लॉकचेन नावाने ओळखतो. ब्लॉकमध्ये वापरकर्ता-ते-वापरकर्ता माहिती असते. अशा परिस्थितीत कोणी हॅक केल्यास माहिती लीक होण्याची शक्यता आहे का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. ब्लॉकचेन इतके गुंतागुंतीचे आहे की ते हॅक करणे अशक्य आहे. ब्लॉकचेन कोणीही हॅक करू शकत नाही, परंतु त्याची कार्यप्रणाली लोकशाही प्रकारची आहे. म्हणजेच ज्याला त्यात काय चालले आहे ते पहायचे असेल तर त्याचा ढवळाढवळ करता येणार नाही. (Blockchain)

आता केंद्र सरकार डिजिटल चलन आणणार आहे. क्रिप्टोकरन्सी आणि त्यात मोठा फरक आहे. क्रिप्टो हे विकेंद्रित चलन आहे. म्हणजेच, व्यवहार किंवा व्यवहाराची पडताळणी करण्यासाठी कोणतीही केंद्रीय एजन्सी नाही. त्याच वेळी, डिजिटल चलनाचे संपूर्ण खाते केंद्रीय एजन्सीकडे असते. त्यामुळे चलनासोबत होणारी फसवणूक पकडली जाऊ शकते. या वर्षी RBI कडून डिजिटल चलन जारी केले जाईल. (Blockchain)

Back to top button