Brij Bhushan Sharan Singh : लैंगिक छळ प्रकरणी खासदार बृजभूषण सिंह यांना जामीन मंजूर!

Brij Bhushan Sharan Singh : लैंगिक छळ प्रकरणी खासदार बृजभूषण सिंह यांना जामीन मंजूर!
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी भाजपचे खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना जामीन मिळाला आहे. गुरुवारी दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने सिंह यांना जामीन मंजूर केला. मात्र, सिंह यांना न्यायालयाला माहिती दिल्याशिवाय विदेशात जाता येणार नाही, अशी अट न्यायालयाकडून घालण्यात आली आहे.

याआधी १८ जुलै रोजी राऊस अव्हेन्यू कोर्टाने ब्रिजभूषण आणि त्यांचे सहआरोपी विनोद तोमर यांना कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. यावेळी ब्रिजभूषण कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर झाले होते. दरम्यान, गुरुवारी २० जुलै रोजी ब्रिजभूषण सिंह यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. कोर्टाने सकाळीच सुनावणी घेऊन जामिनावरील निर्णय राखून ठेवला. त्यानंतर ठीक 4 वाजता कोर्टाने कामकाज सुरु केले आणि ब्रिजभूषण यांना या प्रकरणात नियमित जामीन देण्याचा निर्णय सुनावला.

न्यायालयाने ब्रिजभूषण सिंह आणि विनोद तोमर यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. सिंह यांना न्यायालयाला माहिती दिल्याशिवाय विदेशात जाता येणार नाही, अशीही अट न्यायालयाने घातली आहे. याशिवाय साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणार नाही आणि पुराव्यांशी कोणत्याही प्रकारे छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार नाही, अशी समज देण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २८ जुलै रोजी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news