

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकारी, जवानांसह शहिदांना 76 शौर्य पुरस्कार जाहीर केले.
यामध्ये चार कीर्ती चक्र (मरणोत्तर), तर 11 शौर्य चक्रांचा समावेश आहे. पाच मरणोत्तर पुरस्कारांचा समावेश आहे. कीर्ती आणि दिलीपकुमार दास, राजकुमार यादव, बबलू रंभा आणि संभा रॉय या केंद्रीय राखीव पोलिस दलातील चार जवानांना मरणोत्तर कीर्ती चक्र पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.
मेजर विकास भांबू, मेजर मुस्तफा बोहरा, हवालदार विवेकसिंग तोमर, कुलभूषण मंता आदी जवानांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर करण्यात आले. विविध मोहिमांदरम्यान कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या दोन श्वानांचाही सन्मान करण्यात आला आहे. संरक्षण दलाच्यावतीने ऑपरेशन रक्षक, स्नो लेपर्ड, कॅज्युलिटी इव्हॅक्युशेन, रेस्क्यू, मेघदूत, ऑर्किड, इव्हॅक्युशन आदी मोहिमा राबविल्या जातात.