karishma kapoor : करिश्मा कपूरने पुन्हा एकदा चाहत्यांना दिली गूड न्यूज

karishma kapoor : करिश्मा कपूरने पुन्हा एकदा चाहत्यांना दिली गूड न्यूज
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : ड्राम क्वीन म्हणून ओळखली जाणारी करिश्मा कपूर (karishma kapoor) ही एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने राजा हिंदुस्तानी आणि दिल तो पागल है सह ९० दशकात अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. गोविंदा आणि करिश्माच्या जोडीने तर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. आज सुद्धा तिच्या चाहत्यांना तीची उणीव भासत असते. गेल्या अनेक कालावधींपासून ती मोठ्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. अधून मधून विविध कार्यक्रम व बालीवूड पार्टीमध्ये ती दिसत असते. करिश्मा कपूर हिने तिच्या चाहत्यांना एक गूड न्यूज दिली आहे. या गूड न्यूजमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

करिश्मा कपूरने (karishma kapoor) नुकतेच मेंटलहुड या वेबसिरीजद्वारे ओटीटीच्या जगात प्रवेश केला. आता ती पुन्हा एकदा पूर्णपणे वेगळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. दिल्ली बेली फेम दिग्दर्शक अभिनय देव यांच्या 'ब्राऊन' या चित्रपटात ती दिसणार आहे. करिश्मा कपूरने इंस्टाग्रामवर या प्रोजेक्टची माहिती दिली असून तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. असो, चाहत्यांना तिला एका उत्तम भूमिकेत बघायचे आहे.

करिश्मा कपूरने (karishma kapoor) चाहत्यांना ब्राउनबद्दल माहिती देत ​​'नवीन सुरुवात' असे लिहिले आहे. अमृता अरोरा आणि मनीष मल्होत्रा ​​यांनी तिच्या या पोस्टवर इमोजीद्वारे कमेंट केली आहे. एका चाहत्याने लिहिले आहे, की लोलो आता थांबू शकत नाही. आम्ही तुमची जादू पाहण्यासाठी उत्सुक आहोत. अशाप्रकारे, करिश्मा अभिनयाच्या दुनियेत पुनरागमन करत असल्याने तिचे चाहते खूप आनंदी आहेत.

नव्वदच्या दशकात करिश्माचे 'अंदाज अपना-अपना', 'राजा हिंदुस्तानी' आणि 'दिल तो पागल है' सारखे चित्रपट सुपरहिट ठरले होते. याशिवाय अभिनेता गोविंदासोबतची त्याची जबरदस्त जोडी आणि दोघांचे कॉमिक टायमिंगही खूप आवडले होते. कूली नंबर वन, हिरो नंबर वन, साजन चले ससुराल सारख्या चित्रपटातून गोविंदा आणि करिश्माने चाहत्यांवर वेगळेच गारुड निर्माण केले होते. ४७ वर्षांच्या करिश्मा कपूरने 1991 मध्‍ये 'प्रेम कैदी' चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती.

एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम नृत्यांगना म्हणूनही लोकप्रिय होती. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांच्या नंतर कपूर घरण्यातील पोकळी करिश्मा कपूरने भरुन काढली. अगदी एखाद्या दिग्गज अभिनेत्याला देखिल लाजवेल असा वारसा तिने पुढे चालवून दाखवला. तिच्यानंतर तोच वारसा पुढे करीना कपूर आणि रणबीर कपूरने चालवला आहे. पण, अजून आपण रिटायर झाला नाही आणि पुन्हा एकदा नवी इनिंग खेळण्यास सज्ज झाल्याचेच एक प्रकारे करिश्माने सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news