Preity Zinta
Preity Zinta

Preity Zinta : प्रीतीच्या जुळ्या मुलांचा पहिला वाढदिवस; दाखविली झलक

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' प्रीती झिंटा ( Preity Zinta ) ने २०१६ मध्ये तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या बिझनेसमॅन जीन गुडइनफ (Gene Goodenough ) शी विवाह बंधानात अडकली. दोघेजण सध्या त्याच्या वैवाहिक जीवनात आनंदात आहेत. प्रीतीने गेल्या वर्षी सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांनी जन्म दिला होता. यानंतर सध्या प्रीती तिच्या मुलांचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला आहे.

अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta)ने वाढदिवसाच्या निमित्ताने स्वत: चा मुलांसोबत एक गोंडस फोटो शेअर करून एक पोस्ट लिहिली आहे. यातील एका फोटोत प्रीती मुलगी जिया आणि मुलगा जयसोबत आनंदीत दिसत आहे. यावेळी प्रीतीने ब्लॅक रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तर जियाने येलो रंगाच्या ड्रेस आणि जयने व्हाईट- आकाशी कलरचा टीशर्ट परिधान केला आहे. दोन्ही फोटो वेगवेगळे असून खूपच क्यूट आहेत. कारण, प्रीतीची दोन्ही मुलं गोंडस असून त्याची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळाली आहे. परंतु, प्रीतीने दोघांचे चेहरे स्पष्टपणे दिसत नाहीत. यात जिया पाठीमागे पाहताना तर जय खाली पाहत असल्याने चेहरे स्पष्ट दिसत नाहीत.

प्रीतीने मुलगी जियासोबतच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मला नेहमीच तू हवी होतीस. मी तुझासाठी प्रार्थना केली आणि आता तू मला मिळालीस. एक वर्ष पुर्ण झाल्याने माझे मन भरून आले आहे. तुमचे प्रेमळ हास्य, वॉर्म्थ आणि प्रेजेंन्ससाठी मी नेहमीच ऋृणी राहिन. माझे आयुष्य म्हणजे, छोटी जिया. माझ्या लहान जियाला वाढदिवसाच्या खूपसाऱ्या शुभेच्छा. मला ज्याची अपेक्षा होती ते सर्व काही तूच असून पुढेही तूच राहशील. तुझे जीवन आज आणि नेहमी प्रेम आणि आनंदाने भरून जावो. आय लव्ह यू टू. दिवसेंदिवस माझे तुझ्यावरील प्रेम अनेक पटींनी वाढत आहे.' असे म्हटलं आहे.

प्रीतीने मुलगा जयसोबतचा फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'माझ्या आयुष्यात मी साकारलेल्या सर्व भूमिकापैक्षा ही आईची भूमिका खूपच वेगळी आहे. आणि ती साकारायला मिळतेय हे माझं भाग्य आहे. एका आईची तुलना जगातील कोणत्याच गोष्टीशी होवू शकत नाही. मला खात्री आहे की आम्ही एकमेकांना अनेक आयुष्यांपासून ओळखत आहोत. आम्ही एकमेकांवर किती प्रेम करतो याचा विचारच करू शकत नाही. आई लव्ह यू. वाढदिवसाच्या खूपसाऱ्या शुभेच्छा. तुझे जीवन आज आणि सदैव आनंदाने भरून जावो. परत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझा जय.' असे म्हटलं आहे.

प्रीतीने गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२१ मध्ये सरोगशीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला होता. यानंतर तिने पती आणि मुलांसोबत मौजमस्ती करतानाचे फोटो शेअर केले होते. परंतु, दोन्ही मुलांचे चेहरे दिसले नव्हते. याच दरम्यान प्रीतीने मुलांची नावे जय आणि जिया ठेवल्याची माहिती दिली होती. आता पुन्हा वाझदिवसाच्या निमित्ताने झलक पाहायला मिळाली. प्रीती झिंटा शेवटची 'भैयाजी सुपरहिट' चित्रपटात दिसली होती.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news