

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफच्या अभिनयाससोबतच तिच्या सौंदर्याचे आणि स्टाईलचे अनेक चाहते दिवाने आहेत. कुणीही कॅटच्या सौंदर्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नसले तरी सध्या तिच्यासारख्या दिसणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून कॅटचा पती आणि बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलदेखील आश्चर्यचकित होईल, असा हा व्हिडिओ आहे. (Xerox copy Katrina )
बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिनासारखी दिसणारी ही मुलगी अलीना राय आहे. अलीना एक अभिनेत्री असून तिने बरेच प्रोफेशनल शोजदेखील केलं आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अलीना एका बर्थडे पार्टीत कॅमेऱ्यासमोर आली आणि तिची सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली. या पार्टीतील तिच्या ब्लॅक कलरचा मिनी ड्रेस आणि मोकळ्या केसांनी स्टाईलने चारचाँद लावले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिचे चालणे, बोलणे हुबेहुब अभिनेत्री कॅटरिनासारखे वाटले. त्यामुळे चाहत्यांनी अलीना कॅटची कार्बन कॉपी (Xerox copy Katrina ) म्हटलं आहे. याशिवाय अलीनाने कॅटसारखे दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केल्याचेही माहिती समोर आली आहे.
अलीना राय सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. कॅटरिनसारखी फॅशन करताना तिने वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. अलीनाचे इन्स्टाग्रामवर १ मिलियन फॉलोअर्स आहेत. अलीना पहिले टिकटॉकवर तिचे हटके व्हिडिओ शेअर करत होती. मात्र, टिकटॉक बंद झाले आणि तिने आपला मोर्चा इन्स्टाग्राम अकांऊटकडे वळविला. सोशल मीडियावर अलीना कॅटच्या स्टाईल आणि फॅशनची कॉपी करताना दिसत आहे. यामुळे अनेक चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.
अलीना प्रसिद्ध रॅपर बादशाह यांच्यासोबत 'कमाल' नावाच्या एका म्युझिक अल्बममध्ये दिसली होती. यात ती हुबेहुब कॅटसारखी दिसत होती. यासोबत अलीना अनेक प्रोफेशनल शोमध्येही सहभागी झाली आहे.
हेही वाचलंत का?