Janhvi Kapoor : जान्हवीचे दुबईत ‘सामी-सामी’ (video)

Janhvi Kapoor
Janhvi Kapoor
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) तिच्या 'मिली' चित्रपटापासून चर्चेत आहे. 'मिली' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होताच जान्हवी थेट दुबईला फिल्मफेअर मिडल ईस्ट सोहळ्यात पोहोचली. जाव्हवीने या कार्यक्रामात रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा' चित्रपटातील गाजलेलं 'सामी- सामी' गाण्यावर धमाकेदार परफार्म केला. दुबईतील फोटो  तिने शेअर केले.

दुबईमध्ये फिल्म फेअर मिडल ईस्ट सोहळयाचे आयोजन केले होते. या सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा अवॉर्ड मिळाला. या सोहळ्याला खास करून हेमा मालिनी, तमन्ना भाटिया, करण कुंद्रा, तेजस्वीनी प्रकाश, राखी सावंत, भारती सिंह यासारख्या अनेक कलाकारांनी दमदार हजेरी लावली. यावेळी जान्हवीने अभिनेत्री सश्मिका मंदाना हिच्या पुष्पा चित्रपटाची सामी- सामी या गाण्यावर धमाकेदार डान्स केला. यावेळी जान्हवीने ( Janhvi Kapoor ) निळ्या रंगाच्या लेहग्यांची निवड केली होती. याच दरम्यान जान्‍हवी दुबईतील फोटो तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

जान्हवीने व्हाईट रंगाच्या वनपीसमध्ये एका टेबलावर बसलेली दिसतेय.तर तिच्या पाठीमागे दुबईतील मोठ्या – मोठ्या बिल्डिग दिसतात. केसांची स्टाईल, कानात छोटे इअररिग्स, हाय हिल्स, मेकअप आणि लिपस्टिक तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोला तिने 'Thank you for such a fun night Dubai! ?'. अशी कॅप्शन लिहिली आहे.  हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत. 'Loveeee ??', 'Wow???', 'Soo hot', 'Awmmm❤️', 'Hotest ❤️', 'Stunning ?', 'So sweet', 'Gorgeous??', 'Wow Soooooooo Beautiful♥️?', 'Kya batt ha❤️'. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहे. काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. काही नेटकऱ्यांनी जान्हवीला ट्रोल करत रश्मिका मंदानाची कॉपी करतेय असे म्हटलं आहे.

जान्हवी कपूरचा 'मिली' हा चित्रपट मल्याळम चित्रपट हेलनचा हिंदी रिमेक आहे. जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याशिवाय जान्हवी 'मिस्टर अँड मिसेस माही', 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'बवल', 'दोस्ताना २', 'बॉम्बे गर्ल', 'तख्त' आणि 'रणभूमी' या चित्रपटातही दिसणार आहे. जान्हवीचे हे सर्व चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news