Randeep Hooda Marriage : रणदीप हुड्डा- लिन लैशराम मणिपुरी पद्धतीने विवाहबद्ध (video)

Randeep Hooda Marriage
Randeep Hooda Marriage
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री लिन लैशराम अखेर ( Randeep Hooda Marriage ) लग्नबंधनात अडकले. दोघांनी मणिपूरची राजधानी इम्फाळ येथे हा विवाह सोहळा पार पडला. हा विवाह मणिपुरी पद्धतीने मैतेई समाजाच्या संस्कृतीप्रमाणे हा विवाह संपन्न झाला. या विवाहाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिायवर जोरदार व्हायरल होत आहेत.

संबंधित बातम्या 

गेल्या काही वर्षापासून अभिनेत्री रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम दोघेजण एकमेंकाच्या रिलेशनशीप होते. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रणदीप हुड्डा आणि लिन यांचा शाही विवाह इम्फाळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी काही मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. हा विवाह सोहळा मणिपुरमधील पद्धतीने मैतेई समाजाच्या संस्कृतीप्रमाणे पार पडला.

यावेळी रणदीपने पांढऱ्या रंगाची धोती- कुर्ता, डोक्यावर पगडी परिधान केली होती. तर लिनने यावेळी सिंपल लूकमध्ये ब्लॅक आणि रेड कलरचा लेंहगा परिधान केला होता. यावर तिने भरगच्च सोन्याचे दागिने घातले आहेत. दोघांनी एकमेकांना पांढऱ्या रंगाच्या फुलांची वरमाला घालताना दिसले आहे. या शाही विवाहाचे हटके फोटो आणि व्हिडिओ सोशळ मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी कपलवर भऱभरून शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. रणदीपपेक्षा लिन १० वर्षानी लहान आहे. लिनने प्रियांका चोपडा आणि करिना कपूरसोबत काम केले आहे. सोशल मीडियावर तिचे ९३ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ( Randeep Hooda Marriage )

(video : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Lin Laishram (@linlaishram)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news